मुंबई - रविवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्रीस एका पंचतारांकित हॉटेलमधून ड्रगसह अटक करण्यात आले. ती सहकाऱ्यासोबत ड्रग पार्टी करीत होती. मुंबई पोलिसांना याची सूचना मिळाल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले.
ही बॉलिवूड अभिनेत्री काल पंचतारांकित हॉटेलमध्ये आपला वाढदिवस साजरा करीत होती. यावेळी ती सहकाऱ्यासोबत चरसची पार्टी करीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळाली असता सापळा रचून तिला सहकाऱ्यासह अटक करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अभिनेत्रीचे नाव नायर शाह असे आहे. तिचा वाढदिवस फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साजरा होत होता. या पार्टीला तिच्या मित्रासोबत गोव्याचा रहिवासी असलेला मित्र आशिक हुसेनही हजर होता. दोघेही चरसचा वापर करीत होते. सांताक्रूझ पोलिसांनी सांगितले की त्यांना आज न्यायालयात हजर केले असता जामीन देण्यात आला आहे.
त्यांनी हा चरस कसा मिळवला याबाबतचा तपास मुंबई पोलीस करीत आहे. ड्रग प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आणि नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो सतर्कपणे चौकशी करीत आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू