मुंबई - अमिताभ बच्चन यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली असल्याचे समजते. मात्र याबाबतच्या खुलासा झालेला नाही. तसेच ते २४ तासानंतर घरी परतणार असल्याचेही समजते.
बॉलिवूड हंगामा यांनी दिलेल्या बातमीनुसार, बिग बींना यांना मोतीबिंदू झाला होता. त्याची शस्त्रक्रिया आज पार पडली. ते काही वेळात ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतील, अशी माहिती आहे.
नुकतंच अमिताभ बच्चन यांची तब्ब्येत बिघडल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एका ओळीत लिहिलं की, ‘मेडिकल कंडिशन, सर्जरी यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.’ बिग बी यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या आहेत.
गेल्या वर्षी अमिताभ यांनी कोविड पॉझिटिव्हची चाचणी घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नातू आराध्या यांचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. काही दिवस उपचार घेतल्यानंतर सर्व कुटुंब बरे होऊन घरी परतले होते.
‘सैराट’ निर्माता नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘झुंड’ या सामाजिक चित्रपटात आणि रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या भूमिका असलेल्या अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये बच्चन यांनी काम केले आहे.
बिग बीने अलिकडेच ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोच्या सीझन १२ चे सूत्रसंचालन केले होते.
हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिज आणि अक्षय कुमार यांच्यात काय साम्य आहे?