पंढरपूर - राज्याचे अखंड दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सौंदर्याचा लळा हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनाही लागला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी रविवारी त्यांच्या ट्विटर हँडल वरुन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा सुंदर पोशाख परिधान केलेला फोटो ट्वीट करून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या प्रति आपली भक्ती जागृत केली आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा फोटो मजकुरासह ट्विट
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सुंदर व मनमोहक आशा पोशाख घातलेला फोटो महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत असताना मजकूरही लिहिला आहे. अमिताभ बच्चन म्हणतात " ये व्यक्तीत्व की गरिमा है की, फुल कुछ नही कहते है.. वरना... कभी कांटो को मसलकर दिखाईये" अशाप्रकारचा चार ओळींचा मजकूर लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. यातून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या प्रति असलेली भावना व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या ट्विट केलेल्या फोटोला हजारो जणांनी लाईक केली आहे. अमिताभ बच्चन हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भक्त आहेत. आषाढी व कार्तिकीची एकादशीच्या दिवशी ते विठ्ठल व रुक्मिणी मातेचे फोटो आपल्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत असतात..
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा नित्यपूजा केल्यानंतर फोटो सोशल मीडियावर अपलोड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर गेल्या दीड महिन्यापासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून दररोज केली जाते. त्या पूजेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुंदर व मनमोहक अशी पोषाख परिधान करून नित्य पूजा व काकड आरती करण्यात येते. त्यानंतर ते फोटो मंदिर समितीकडून भाविकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड केले जातात. राज्यासह देशांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेचे हजारो वारकरी भक्त आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज होणाऱ्या नित्य पूजाचे फोटो भाविकांना त्यानिमित्ताने पाहावयास मिळतो
हेही वाचा - पालखी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक