ETV Bharat / sitara

अमिताभने भरला ७० कोटींचा आयकर, दातृत्वही दिले दाखवून - 70 crore income tax

अमिताभ बच्चन यांनी गेल्या आर्थिक वर्षात ७० कोटीचा आयकर भरला आहे...केरळ पुरग्रस्तांसाठी ५१ कोटी तर पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्यांना त्यांनी दिले प्रत्येकी १० लाख...बिहारच्या २०८४ शेतकऱ्यांचे कर्जही बिग बींनी भरले होते....

Big B pay tax
author img

By

Published : Apr 13, 2019, 6:16 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी २०१८ - १९ या आर्थिक वर्षात ७० कोटी रुपयांचा कर भरला आहे. अमिताभच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे अमिताभ सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलेब्रिटींच्या यादीत वरचढ ठरले आहेत.

अमिताभ यांनी ७० कोटीचा करभरणा आयकर विभागाकडे केला आहे. याशिवाय त्याने बिहारमधील मुझफ्फर येथील २०८४ शेतकऱ्यांचे आपल्या पैशातून भागवले होते. अलिकडे पुलवामा येथे सीआरपीएफ जवानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पावलेल्या सर्व जवानांना अमिताभ यांच्या वतीने प्रत्येकी १० लाखाची मदत देण्यात आली होती. तसेच केरळमध्ये आलेल्या प्रलयंकारी महापूरातील लोकांसाठी अमिताभ यांनी ५१ लाखाची मदत पाठवली होती.

अमिताभ यांनी दाखवलेली दातृत्व कौतुकास्पद आहे. याचा आदर्श बॉलिवूडचे इतर कलाकारही घेतील अशी अपेक्षा आहे. काही महिन्यापूर्वी 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' हा चित्रपट तिकीट बारीवर कोसळला होता. मात्र सध्या अमिताभचा अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यासोबत 'बदला' हा चित्रपट प्रदर्शित झालाय. त्याला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळतो. 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटींग सुरु असून नागराज मंजुळेंसोबत 'झुंड' या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.