ETV Bharat / sitara

स्वतःसोबत फोटो काढण्यासाठी बिग बी यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम कडे घातली गळ!

author img

By

Published : Oct 11, 2021, 3:09 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी लोक स्वप्न पाहात असतात. परंतु बच्चन यांनी स्वतः फोटो काढण्यासाठी विनंती करण्याचा प्रसंग ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी किर्तीकुमार कदम यांच्यासोबत घडला. आज बिंग बी यांच्या वाढदिवसानिमित्त हा किस्सा खास बच्चन चाहत्यांसाठी कदम यांनी शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांचा पत्रकारांसोबत फोटो
अमिताभ बच्चन यांचा पत्रकारांसोबत फोटो

पूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या फॅन्स ना भेटल्यावर स्वाक्षरी द्यायचे. आता त्याची जागा सेल्फी ने घेतली आहे. सेलिब्रिटीज बरोबर फोटो काढण्याचा योग फार दुर्मिळ असतो आणि त्यामुळे ज्यांना हा मौका मिळतो त्यांची त्यांच्या मित्रमंडळीत, नातेवाईकांत आणि ओळखीच्या लोकांत ‘कॉलर टाईट’ असते. अर्थात अनेकांना त्याबद्दल अप्रूप तर वाटतेच परंतु काहींचे मन खट्टू होते. “त्या स्टारचा ‘याच्यासोबत’ फोटो कसा काय?” हा प्रश्न काहींना सतावत असतो यातून ‘त्याचा’ दुस्वासही केला जाऊ लागतो. खरंतर हा मनुष्यधर्म आहे आणि ‘जेलसी’ ही एक भावना आहे जी ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी?’ या उक्तीप्रमाणे काहींना सतावत असते. असो. फिल्म पत्रकारांना, मुलाखती वा चित्रपट विषयक इव्हेंट्स मध्ये, छोट्या आणि मोठ्यासुद्धा स्टार्सना भेटण्याची संधी मिळत असते. साहजिकच त्यांना स्टार्ससोबत फोटो काढण्याची संधी अधिक मिळते.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

परंतु असं कधी ऐकलंय का की स्टार ने, तेही मोठ्या सुपरस्टारने पत्रकाराला फोटो साठी गळ घातली आहे? अशी एकमद्वितीय घटना घडलीय आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम याच्यासोबत जेव्हा दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याला विनवणी केली.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

केबीसीच्या नव्या पर्वानिमित्य झाली होती पत्रकार परिषद

कोरोना महामारीने मनोरंजनसृष्टी बंद पडण्याच्या आधी अमिताभ बच्चन यांची ‘केबीसी’ च्या पर्वाची एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. बिग बी यांची पत्रकार परिषद असल्यामुळे पत्रकारांची तोबा गर्दी होती आणि सर्व पत्रकार अर्धगोलाकार प्रेक्षक कक्षात बसले होतो आणि मध्यभागी स्टेजवर असलेल्या अमिताभजींसोबत वार्तालाप सुरु होता. पत्रकार परिषद संपली आणि शिरस्त्याप्रमाणे सर्वांनी अमिताभ बच्चन यांना फोटोसाठी विनंती केली. परंतु गर्दी खूप असल्याने बच्चन साहेबांनी त्यावर तोडगा काढला. ते म्हणाले की मी स्वतः खालच्या लाईनीत बसलेल्या पत्रकाराजवळ येईन आणि फोटो काढताना वरच्या रांगेतील पत्रकारही फोटोमध्ये येतील. वेळेच्या अभावापोटी हे करावे लागत असल्यामुळे सर्वांनी त्यास मान्यता दिली, ज्यात आमचे प्रतिनिधी होते जे खालच्याच रांगेत बसले होते.

अमिताभ बच्चन यांचा पत्रकारांसोबत फोटो
अमिताभ बच्चन यांचा पत्रकारांसोबत फोटो

बिग बी यांचे फोटोसेशन

आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम म्हणाले की, “अमिताभ बच्चन यांनी एका बाजूने फोटो देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू पुढे सरकत होते. माझा नंबर येण्यास थोडा वेळ होता. या ग्रुपफोटोबरोबर अमितजी जवळ आल्यावर एखादा सेल्फी काढता येतो का म्हणून मी माझा मोबाईल निरनिराळ्या अँगल्सने तपासात होतो. व्यवस्थित अँगल शोधत असताना अचानक माझ्या खांद्यावर एक थाप पडली आणि एक धीरगंभीर आवाज आला, ‘महोदय, थोडा हमारे पास भी देखिये. हम अमिताभ बच्चन हैं, एक छोटेमोटे कलाकार हैं. हमें आपके साथ फोटो चाहिये. कृपया आप हमारे साथ फोटो खिंचवानेका कष्ट करेंगे? आपके साथ फोटो मिलना ये हमारी खुशनसीबी होगी.”

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन

बिग बींच्या विनंतीने पत्रकारांत खळखळाट

“झालं होतं असं की सेल्फी अँगल शोधण्याच्या नादात बिग बी माझ्याजवळ कधी येऊन उभे राहिले हे कळलंच नाही. आणि त्यानंतर त्यांच्या ‘बॅरिटोन’ आवाजातील शब्द इतक्या जवळून ऐकताना मला काहीच कळत नव्हते. त्यांच्या मिश्किल टिप्पणीने मला हसू अनावर झाले आणि उपस्थितांमध्ये हास्याचा गडगडाट झाला. बिग बी यांचा हा मिश्किल आणि समोरच्याला मान देण्याचा स्वभाव सर्वश्रुत आहे जो मी प्रत्यक्षात अनुभवला. इतका मोठा सुपरस्टार मला रागावू शकला असता किंवा माझ्यापासून बिनदिक्कतपणे फोटो न काढता पुढे सरकू शकला असता. परंतु त्यांनी तसं न करता खेळीमेळीने प्रसंग हाताळला. खरंतर तर एक माणूस म्हणूनही बिग बी खूप मोठे आहेत हे नक्की. मी अमिताभ बच्चन यांचा फॅन होतोच परंतु त्या दिवसापासून मी त्यांचा, त्यांच्या स्वभावाचा खूप मोठा प्रशंसक झालोय”, कीर्तिकुमार कदमने भावनाप्रधान होतं सांगितले.

आज, मिलेनियम स्टार आणि भारताचा आजपर्यंतचा सर्वात मोठा सुपरस्टार, श्री अमिताभ बच्चन यांचा प्रकटदिन आहे आणि ईटीव्ही मराठी काढून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा - BIG B BIRTHDAY बॉलीवुडचे बादशाह अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस, 'या' सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर गाजविले अधिराज्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.