ETV Bharat / sitara

'या' व्यक्तींमुळे खास ठरला 'सांड की आँख'च्या सेटवरील अनुभव, भूमीनं शेअर केला व्हिडिओ - दिवाळी

व्हिडिओमध्ये भूमी चित्रपटाच्या सेटवर आपल्या लहानग्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या लहान मुलांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खास बनवला, असं भूमी या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

भूमीनं शेअर केला व्हिडिओ
author img

By

Published : Aug 9, 2019, 10:12 PM IST

मुंबई - 'टॉयलेट - एक प्रेम कथा' चित्रपटातील आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर लवकरच 'सांड की आँख' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती शार्पशूटर प्रकाशी तोमर यांची भूमिका साकारणार असून नुकतंच तिने चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये भूमी चित्रपटाच्या सेटवर आपल्या लहानग्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या लहान मुलांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खास बनवला. माझा वेळ त्यांच्या प्रेमात कसा गेला समजलंच नाही, असं भूमी या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

दरम्यान भूमीशिवाय या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तुषार हिरानंदानी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमार यांनी केली आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

Actress Keerthi Suresh response on winning National Awards..Byte in English and Telugu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.