मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. भूमीच्या मते, सध्याच्या काळात प्रेक्षकांसाठी नायिकेची भूमिका बदलली आहे. सध्या प्रेक्षक प्रत्येक भूमिका आणि कथा स्वतःशी रिलेट करत असतात. त्यात ते स्वतःला पाहात असतात.
भूमी म्हणाली, मी आतापर्यंत काम केलेल्या सर्व चित्रपटांमधील माझ्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. यातील कथांमध्ये काही प्रमाणात समानता असू शकते. जसं की, माझे बहुतेक चित्रपट स्त्रियांवर आधारित असतात. मी आतापर्यंत केलेल्या सिनेमांचा मला अभिमान आहे. कारण हे चित्रपट माझ्या प्रेक्षकांशी संपर्क साधण्यास आणि त्यांच्याशी जुळण्यास मदत करतात.
प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी किंवा त्यांच्याशी जुळण्यासाठी परिपूर्ण कथेची गरज नसते. कधीकधी अपूर्ण किंवा अगदी साधे चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. जर ही कथा प्रेक्षकांसमोर खऱ्या जीवनासोबत संबंधित किंवा प्रेक्षक चित्रपटातील पात्रामध्ये स्वतःला पाहू शकले, तर मी एक कलाकार म्हणून यशस्वी झाले. त्यामुळे, माझा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत महत्तवपूर्ण आणि उत्तम झाल्याचे भूमी म्हणाली. भूमीने सांड की आँख, दम लगा के हैशा आणि शुभ मंगल सावधानसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.