ETV Bharat / sitara

भूमी पेडणेकरने झिरो डिग्रीमध्ये केले 'बधाई दो'चे शूटिंग - ‘बधाई दो’ चित्रपटाचे शूटिंग

भूमी पेडणेकर सध्या 'बधाई दो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. झिरो डिग्री सेल्सियसमध्ये ती काम करीत असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवरुन दिसते. अंथरुणातून बाहेर पडण्याची इच्छा नसल्याचे तिने म्हटलंय.

Bhoomi Pednekar
भूमी पेडणेकर
author img

By

Published : Jan 29, 2021, 7:23 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती झिरो डिग्री सेल्सियसमध्ये तिच्या आगामी ‘बधाई दो’ चित्रपटाचे शूटिंग करताना दिसत आहे. 'बधाई हो' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा हा सीक्वल चित्रपट आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये भूमी बेडवर पडलेली दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, “सुमीला आज तिचा बिछान सोडण्याची इच्छा नाही. 0 (डिग्री सेल्सियस), ४.३७ एएम.''

या चित्रपटात भूमी पेडणेकर सुमी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

यानंतर, भूमीने शुक्रवारी सकाळी ५.०४ वाजता दुसरा फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती गरमागरम कॉफीचा स्वाद घेताना दिसत आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "कारण आपल्याला जे करायचे आहे ते करावेच लागेल. मला तयार असावे लागेल."

चित्रपटाचे चित्रीकरण लोकेशन्सवर होत आहे याचा खुलासा भूमीने केलेला नाही.

हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव देखील भूमिका साकारत आहे.

हेही वाचा - अखेर बहुप्रतीक्षित 'केजीएफ २'च्या रिलीजची तारीख ठरली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.