मुंबई - अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या आगामी 'खाली-पीली' या चित्रपटाचे 'बियॉन्स शरमा जायगी' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात या जोडीने बरीच रंगत भरली आहे आणि लोक सोशल मीडियावर त्यांच्या डान्स मुव्हजचे कौतुक करीत आहेत. हे गाणे सर्कस सेटअपमध्ये शूट केले गेले आहे. हे गाणे व्हायरल होत आहे.
'बियॉन्स शरमा जायगी' या गाण्यामध्ये लॉक करणे, पॉपिंग करणे, कथक आणि बरेच मजेदार नृत्य सादर केले गेले आहेत. हे गाणे सर्कस थीमवर चित्रीत केले गेले आहे, त्यामुळे यामध्ये रिंग डान्स आणि फायर डान्स सारख्या बर्याच कला प्रकारांचा वापर करण्यात आला आहे. ज्यांना बॉलिवूडची गाणी आवडतात त्यांच्यासाठी हे गाणे पूर्णपणे मनोरंजन आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या चित्रपटाचे दिग्दर्शक मकबूल खान म्हणाले, "या गाण्यात ईशान आणि अनन्या यांच्यातील केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. डान्स मुव्हजने या गाण्याने लोकांची मने जिंकली आहेत."
हे गाणे दिग्गज संगीतकार विशाल-शेखर यांच्या जोडीने संगीतबद्ध केले आहे, तर आवाज नकश अजीज आणि नीती मोहन यांनी दिलेला आहे.
'खाली-पीली' या चित्रपटाचे दिग्दर्शन मकबूल खान यांनी केले असून अली अब्बास जफर आणि हिमांशु मेहरा निर्माते आहेत. हा चित्रपट 2 ऑक्टोबरला झीच्या नवीन प्लॅटफॉर्मवर झी प्लेक्सवर रिलीज होईल.