नवी दिल्ली - अभिनेता आयुष्मान खुरानाने 'जोकर'च्या लूकमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आयुष्मानने शेअर केलेला हा फोटो स्वप्नील पवारने त्याच्या आर्टवर्कच्या माध्यमातून तयार केला आहे.
या फोटोला आयुष्मानने कॅप्शन दिलंय की, मी एखादी योजना करुन आलेल्या व्यक्तीसारखा दिसतो का? तुम्हाला माहितीए का की मी कोण आहे? मी कारचा पाठलाग करणारा कुत्रा आहे का? जर मी पकडलो गेलो तर मला माहिती नाही की मी काय करायचं. मी अराजकतेचा एजंट आहे!! आयुष्मान पुढे लिहीतो की, मला रानटीपणा, वाईट, शांत, हुशार आणि भयानक अशी नेहमीच जोकर सारखी नकारात्मक भूमिका साकारायची होती.
आयुष्मानने त्याच्या करीअरमध्ये आतापर्यंत नकारात्मक भूमिका साकारलेली नाही. मात्र सकारात्मक संदेश असणार्या वेगवेगळ्या नकारात्मक भूमिका साकारायला आवडेल, असे आयुष्मान लिहितो. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच त्याचा 'गुलाबो सिताबो' चित्रपट अमॅझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिताभ बच्चन देखील महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहेत.