मुंबई - आपल्या मंत्रमुग्ध आवाजामुळे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांची कारकीर्द प्रचंड मोठी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गायक अवधुत गुप्ते, महेश काळे आणि बेला शेंडे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना लतादिदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लतादीदींच गाणं ज्या युगात घडलं त्या युगात जगल्याचा मला सार्थ अभिमान - अवधूत गुप्ते
लतादीदींच गाणं ज्या युगात घडलं त्या युगात आम्हीही होतो. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचं मत गायक संगीतकार अवधूत गुप्ते याने व्यक्त केलं आहे. तर, लतादीदींच्या गायकीची तुलना फक्त परिपूर्णता या शब्दाशी करता येईल एवढं त्यांचं गाणं तरल असल्याचं मत शास्त्रीय गायक महेश काळे याने व्यक्त केलं आहे.
त्यांचं कोणतंही एक गाणं आवडत म्हणून निवडणे शक्य नसल्याचे त्याने सांगितलं. तर लतादीदींच गाणं कायमच मनाला दिलासा आणि शांतता मिळवून देत असल्याचं गायिका बेला शेंडे हिला वाटत. लतादीदींच्या अगणित गाण्याची मोहिनी पडल्यानेच गायनकलेत येण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचं मत गायिका कार्तिकी गायकवाड हिने सांगितलं. या सगळ्यांनी मिळून लतादीदींना त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
'लतादीदींच असणं हे आमच्या आयुष्यात पाण्याएव्हढंच महत्वाचं' - बेला शेंडे
लतादीदींची गाणी आपल्या आयुष्यात असणं हे पाण्याएव्हढंच महत्वाचं असल्याचं मत मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आहे. त्यानी गायलेली अनेक अवीट गोडीची गाणी आजही आमच्या मनावर रुंजी घालतात. आम्ही खरंच भाग्यवान की दिदीची गाणी ऐकण्याच भाग्य मिळालं, अशा भावना बेले शेंडेने व्यक्त केल्या.
हेही वाचा -B'day Spl:मेरी आवाजही पेहचान है मेरी..संगीतात बहरलेली 'स्वरलता'