ETV Bharat / sitara

' एक हिंदू म्हणून मला लाज वाटते', बजरंग दलाच्या कृत्यानंतर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

शुक्रवारी मुस्लिम समुदायाचे काही सदस्य गुरुग्रामच्या सेक्टर 12-ए मधील एका खाजगी मालमत्तेवर शांततेत नमाज अदा करत होते, तेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा कथित जमाव हिंसक झाला. ते नमाजच्या ठिकाणी पोहोचले आणि नमाज पठण करणाऱ्यांसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा देऊ लागले.

author img

By

Published : Oct 23, 2021, 10:24 PM IST

स्वरा भास्करची प्रतिक्रिया
स्वरा भास्करची प्रतिक्रिया

मुंबई - अभिनेत्री स्वरा भास्करने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुग्राममध्ये प्रार्थना करत असलेल्या लोकांसमोर जय श्री रामचा जप केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे आणि या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप ट्विट करून म्हटले आहे, की तिला एक हिंदू म्हणून लाज वाटते. तिने एका ओळीच्या ट्विटमध्ये लिहिले, ' एक हिंदू म्हणून मला लाज वाटली!' दुसरीकडे, सोशल मीडिया युजर्सनी याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देणे सुरू केले. यामुळे 'नमाज' ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.

लोकही स्वराच्या या ट्विटवर वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, 'असे विधान तुमचे पहिल्यांदा आलेले नाही, 'जर तुम्ही तुमच्या धर्माचा इतका तिरस्कार करत असाल तर तो बदला.'

कुकिल शर्मा नावाचा दुसरा युजर म्हणतो, 'अशा लोकांच्यामुळे हिंदू धर्म बदनाम होतो. कोणाच्याही प्रार्थनेत अडथळा आणण्याचा यांना अधिकार नाही.'

आणखी एका युजरने म्हटलंय, 'आज हिंदू-मुस्लिम भारतात भिन्न दिसत आहेत, पण दोघांचाही या देशावर अधिकार आहे.'

खरं तर, जेव्हा मुस्लिम समाजातील काही सदस्य गुरुग्रामच्या सेक्टर 12-ए मधील एका खाजगी जागेवर शांततेने नमाज अदा करत होते, तेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा जमाव तेथे जमा झाला. जमावातील लोकांनी नमाज पठण करणाऱ्या लोकांसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा शहरातील सेक्टर 47 मध्येही अशीच एक घटना घडली होती. जिथे सरकारी जमिनीवर उघड्यावर नमाज अदा करण्यावर बंदी घालण्याची मागणी होती. शुक्रवारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने पोलीस (रॅपिड अॅक्शन फोर्सच्या सदस्यांसह) मुस्लिम समाजातील लोकांच्या नमाजाची तयारी करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये डझनभर पोलीस पिवळ्या बॅरिकेडच्या मागे उभे असलेले दिसतात. ते 'जय श्री राम'चा जयघोष करणाऱ्या जमावाला थांबवत आहेत.

दोन्ही प्रकरणांमध्ये (सेक्टर 47 आणि सेक्टर 12-ए), प्रार्थनास्थळे गुरुग्राम प्रशासनाने ओळखलेल्या 37 ठिकाणांपैकी आहेत, जिथे मुस्लिमांना नमाज अदा करण्याची परवानगी आहे. 2018 मध्ये अशीच एक घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने हिंदू आणि मुस्लिमांमधील चर्चेनंतर ही ठिकाणे निश्चित केली होती.

हेही वाचा - ऑस्करसाठी तमिळ 'कूजंगल', 'सरदार उधम', 'शेरनी'सह 14 सिनेमांचा नामांकनात समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.