ETV Bharat / sitara

Article 15 teaser: जाती, धर्माच्या नावाखाली फरक खूप केला, आता फरक आणणार

देशात जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर होणारे भेदभाव आणि यातून होणाऱ्या आत्महत्या हे समाजातील एक भयानक वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.

'आर्टिकल १५' चा टीझर प्रदर्शित
author img

By

Published : May 27, 2019, 6:16 PM IST

मुंबई - आयुष्मान खुराणाची मुख्य भूमिका असलेल्या 'आर्टिकल १५' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. उत्कंठा वाढवणाऱ्या या पोस्टरनंतर प्रेक्षक चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत असतानाच हे टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

भारताच्या संविधानातील समतेचा अधिकार या 'आर्टिकल १५' वर चित्रपटाची कथा आधारित असणार आहे. देशात जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, असं वाक्य या टीझरमध्ये ऐकायला मिळतं.

'आर्टिकल १५' चा टीझर प्रदर्शित

या सर्वावरून देशात होणारे भेदभाव आणि यातून होणाऱ्या आत्महत्या हे समाजातील एक भयानक वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. फरक खूप केला, आता बदल घडवणार, असं वाक्य आयुष्मानच्या तोंडून या टीझरमध्ये ऐकायला मिळतं. ३० मे ला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर २८ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.