मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या बच्चन लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्याचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच आराध्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती आई ऐश्वर्या आणि वडील अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओमध्ये ऐश्वर्या पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या कमीत कमी मेकअप आणि मोकळे केस सोडत साध्या लूकमध्ये दिसत आहे. तर अभिषेक पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये खूप छान दिसत आहे. त्यांची कन्या आराध्या लाल ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. प्रियांका चोप्राच्या 'देसी गर्ल' गाण्यावर आराध्या आई ऐश्वर्या आणि वडील अभिषेकसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आराध्याने गाण्यावर प्रियांका चोप्राप्रमाणे डान्स स्टेप्स केले, हे पाहून ऐश्वर्याने घाईघाईत आराध्याला मिठी मारली. या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत आहेत.
हेही वाचा - Amitabh Bachchan's Post : 'काम वाम सब बंद है... बस...' असे लिहित अभिमाभ बच्चन यांनी शेअर केला फोटो