ETV Bharat / sitara

'पती पत्नी और वो'मध्ये झळकणार अपारशक्ती खुराणा; स्वतःच केला खुलासा - ayushmann khurana

काही दिवसांपूर्वीच 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. याच चित्रपटात अपारशक्तीची वर्णी लागली आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

'पती पत्नी और वो'मध्ये झळकणार अपारशक्ती खुराणा
author img

By

Published : Jul 20, 2019, 9:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आता अपारशक्तीने आपल्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्याने याबद्दलचा खुलासा केला.

काही दिवसांपूर्वीच 'पती पत्नी और वो' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. याच चित्रपटात अपारशक्तीची वर्णी लागली आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. अपारशक्तीनं याआधीही लुका छुपी चित्रपटात कार्तिकसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

पुन्हा एकदा भूषण कुमार यांच्यासोबत काम करत असल्यानं चांगलं वाटतं आहे. लुका छुपीमुळे माझी कार्तिकसोबत चांगली मैत्री झाली आहे. अशात आता पुन्हा एकदा लोकांना आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचे अपारशक्ती म्हणाला. दरम्यान हा चित्रपट १९७८ मध्ये आलेल्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. येत्या ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

Entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.