ETV Bharat / sitara

आलियानं शेअर केला सकाळच्या सूर्यप्रकाशातील फोटो; म्हणाली, अनुष्काकडून मिळाली प्रेरणा - आलियाचे आगामी सिनेमे

फोटोला कॅप्शन देत आलिया म्हणाली, हॅपी सनलाईट संडे. पुढे ती म्हणाली माझ्या घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशात फोटो काढण्यासाठी मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद अनुष्का. हा प्रकाश तुझ्या आणि माझ्या आयुष्यात नेहमी येत राहो. यावर अनुष्कानंही लगेचच कमेंट केली आहे. अभिनेत्री म्हणाली, अशा प्रेरणेसाठी नेहमी माझ्याकडे ये.

alia bhatt inspired by anushka sharma
आलियाला अनुष्काकडून मिळाली प्रेरणा
author img

By

Published : Jun 14, 2020, 3:42 PM IST

मुंबई - अभिनेत्री आलिया भट्टनं सोशल मीडियावर नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे. हा सन किस फोटो काढण्यासाठी अनुष्का शर्मानं आपल्याला प्रेरणा दिल्याचं तिनं सांगितलं आहे. रविवारी सकाळी आलियानं नैसर्गिक लाईटमधील आपला हा फोटो शेअर केला.

फोटोला कॅप्शन देत आलिया म्हणाली, हॅपी सनलाईट संडे. पुढे ती म्हणाली माझ्या घरात येणाऱ्या सूर्यप्रकाशात फोटो काढण्यासाठी मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद अनुष्का. हा प्रकाश तुझ्या आणि माझ्या आयुष्यात नेहमी येत राहो. यावर अनुष्कानंही लगेचच कमेंट केली आहे. अभिनेत्री म्हणाली, अशा प्रेरणेसाठी नेहमी माझ्याकडे ये.

काही दिवसांपूर्वी अनुष्कानंही आपल्या घरात येणाऱ्या सुर्यप्रकाशात फोटो काढला होता. लॉकडाऊनदरम्यान अभिनेत्रीनं घराच्या कोपऱ्यांमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशातील अनेक फोटो शेअर केले होते. तर, दुसरीकडे आलिया सध्या लॉकडाऊनदम्यान रणबीर कपूरसोबत वेळ घालवत आहे.

चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास आलिया शेवटचं कलंक चित्रपटात वरुण धवनसोबत झळकली होती. यानंतर लवकरच ती ब्रह्मास्त्र सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती रणबीरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय गंगुबाई काठियावाडी आणि सडक 2 सिनेमातही ती झळकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.