मुंबई - बॉलिवूडमधील अनेक कलाकार चित्रपटांमध्ये एकमेकांच्या घट्ट मित्राची भूमिका साकारत असतात. पण खऱ्या आयुष्यात यातील काहींचं एकमेकांसोबत वैर असतं तर काही रिअल लाईफमध्येही तितकेच घट्ट मित्र असतात. अशीच अनुपम खेर आणि अनिल कपूरची जोडी आहे.
अनुपम खेर यांनी नुकताच शेअर केलेला फोटो त्यांच्या मैत्रीविषयी सर्व काही सांगून जातो. हा फोटो १९८९ मध्ये आलेल्या 'परींदा' चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटात अनिल कपूरने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. तर अनुपम खेर पोलिसाच्या भूमिकेत होते.
-
The best mirror is an old friend.😊🤓😍 @AnilKapoor #LessonsLifeTaughtMeUnknowingly pic.twitter.com/88IrNFeqe8
— Anupam Kher (@AnupamPKher) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The best mirror is an old friend.😊🤓😍 @AnilKapoor #LessonsLifeTaughtMeUnknowingly pic.twitter.com/88IrNFeqe8
— Anupam Kher (@AnupamPKher) July 22, 2019The best mirror is an old friend.😊🤓😍 @AnilKapoor #LessonsLifeTaughtMeUnknowingly pic.twitter.com/88IrNFeqe8
— Anupam Kher (@AnupamPKher) July 22, 2019
या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये अनुपम यांनी म्हटलं, 'जुने मित्र हे सर्वात उत्तम आरसा असतात. आयुष्याने नकळत शिकवलेले धडे'. दरम्यान अनुपम आणि अनिल कपूर यांनी आतापर्यंत 'राम लखन', 'जमाई राजा' आणि 'तेजाब'सारख्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास अनुपम खेर लवकरच रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.