मुंबई - चीनमधून जगभरात वेगात पसरणारा कोरोना विषाणूची भारतातही दहशत पाहायला मिळत आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसचे सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजनाही करण्यात येत आहे. परदेशातून भारतात परतणाऱ्या नागरिकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. यामध्ये गायक अनुप जलोटा यांचाही समावेश झाला आहे.
जलोटा यांनी स्वत: च याबाबतची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. अलिकडेच ते लंडनवरुन भारतात परतले. मात्र, त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाजवळील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. यासाठी अनुप जलोटा यांनी यासाठी मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत.
हेही वाचा -कोरोनाच्या भितीने 'आयसोलेशन'मध्ये गेले दिलीप कुमार, सायरा घेताहेत काळजी
-
I am in awe with the Medical Care offered by BMC for passengers who are 60+. I was taken to Hotel Mirage as I landed MUM from LDN ;a team of doctors was sent to attend me. I appeal each passenger landing here to cooperate and help in controlling the further spread #COVID19india pic.twitter.com/y12ZssVyFP
— Anup Jalota (@anupjalota) March 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I am in awe with the Medical Care offered by BMC for passengers who are 60+. I was taken to Hotel Mirage as I landed MUM from LDN ;a team of doctors was sent to attend me. I appeal each passenger landing here to cooperate and help in controlling the further spread #COVID19india pic.twitter.com/y12ZssVyFP
— Anup Jalota (@anupjalota) March 17, 2020I am in awe with the Medical Care offered by BMC for passengers who are 60+. I was taken to Hotel Mirage as I landed MUM from LDN ;a team of doctors was sent to attend me. I appeal each passenger landing here to cooperate and help in controlling the further spread #COVID19india pic.twitter.com/y12ZssVyFP
— Anup Jalota (@anupjalota) March 17, 2020
महाराष्ट्रात पुणे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -कोरोना व्हायरसच्या चुकीच्या बातम्यांपासून सावध रहा - प्रियंका चोप्रा