ETV Bharat / sitara

Sequel of Rowdy Rathod : केव्ही विजयेंद्र प्रसाद लिखीत अक्षय कुमारच्या 'राउडी राठोड 2'ची घोषणा - Sequel of Rowdy Rathod

अक्षय कुमारने नवीन वर्षाच्या अगोदर चाहत्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे. 'राउडी राठोड -2' ( Rowdy Rathod 2 Movie )या आगामी चित्रपटाची त्याने घोषणा केली आहे. चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबिना खान यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची ( Sequel of Rowdy Rathod ) पुष्टी केली होती. 2020 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे ते काम थांबवण्यात आले होते.

अक्षय कुमारच्या 'राउडी राठोड 2'ची घोषणा
अक्षय कुमारच्या 'राउडी राठोड 2'ची घोषणा
author img

By

Published : Dec 22, 2021, 3:30 PM IST

मुंबई - अक्षय कुमार ( Akshay Kumar ) हा बॉलिवूडचा संपूर्ण मनोरंजन करणारा अभिनेता आहे. दरवर्षी किमान 3 ते 4 चित्रपट करून अक्षय आपली झोळी तर भरतोच पण चाहत्यांसाठी भरपूर मनोरंजनही देत असतो. अक्षय कुमार वैविध्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखला जातो. अक्षयकडे सध्या आठ चित्रपटांची ( Eight movies in Akshay Kumars hands ) यादी आहे आणि अशा परिस्थितीत त्याचा नववा 'राउडी राठोड -2' देखील जाहीर झाला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

अक्षय कुमारने नवीन वर्षाच्या अगोदर चाहत्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे. 'राउडी राठोड -2' या आगामी चित्रपटाची त्याने घोषणा केली आहे. चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबिना खान यांनी चित्रपटाच्या सिक्वेलची पुष्टी केली होती. 2020 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे ते काम थांबवण्यात आले होते. चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करणारे लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद ( Writer KV Vijayendra Prasad ) यांनी चित्रपटाच्या कथेवर काम सुरु असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, 'बाहुबली'चे लेखक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील केव्ही विजयेंद्र या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी करणार आहेत. अक्षय कुमार स्टारर 'राउडी राठोड' हा तेलगू चित्रपट 'विक्रमकुडू'चा हिंदी रिमेक होता, ज्याचे लेखन प्रसाद यांनी केले होते.

रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा सीक्वल फक्त हिंदीत बनवला जाणार आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की नुकताच सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा ( Bajrangi Bhaijaan Movie Sequel ) करण्यात आली होती. केव्ही विजयेंद्र प्रसाद ( KV Vijayendra Prasad ) यांनी लिहिलेल्या 'बजरंगी भाईजान'च्या सिक्वेलची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे.

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट ( Akshay Kumars Upcoming Film )

अक्षय कुमार आगामी 'ओएमजी-2', 'राम सेतू', 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे', 'रक्षा बंधन', 'सिंड्रेला' आणि 'गोरखा' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार शेवटचा 'सूर्यवंशी' चित्रपटात दिसला होता.

हेही वाचा - Mumbai Police On Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतची होणार चौकशी, मुंबई पोलिसांसमोर येण्यास मागितली वेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.