मुंबई - दोनेक महिन्यांपूर्वी अजय देवगणने अमिताभ बच्चन यांना त्याच्या ‘मे-डे’ या आगामी चित्रपटात घेण्याची घोषणा केली तेव्हा त्याच्या व अमितजींच्या चाहत्यांमध्ये ‘आनंदाची लहर’ पसरली होती. जेव्हा जेव्हा हे दोन कलाकार एकत्र आलेत, तेव्हा तेव्हा त्यांनी हिट चित्रपट दिलाय. खाकी, मेजर साब, सत्याग्रह सारख्या चित्रपटांमधून ते एकत्र दिसले. परंतु या नवीन चित्रपटात अमिताभ बच्चन अजय देवगनच्या दिग्दर्शनाखाली काम करणार आहेत.
आज अमिताभ बच्चन यांनी शूटिंगला जातेवेळी आपल्या समाज माध्यम हँडलवर पोस्ट टाकली...“नई फ़िल्म का पहला दिन, और हालत ख़राब ! tension apprehension नर्वस इयं“...
अमिताभ यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. नवीन काम सुरु करताना टेन्शन असणे हे गुणी अभिनेत्याचे लक्षण आहे व अमितजींच्या अभिनयाबद्दल पामरांनी न बोलणंच बरं. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी गुप्तता पाळण्यात आली असली तरी अजय देवगण पायलट च्या भूमिकेत असणार आहे असे कळते व त्याची विमानात साथ देणारी को-पायलट आहे राकुल प्रीत सिंग.
खुर्चीला खिळवून ठेवणारे याचे कथानक असून ‘मे-डे’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण गेल्या महिन्यातच सुरु झाले आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरी अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत असून, अंगिरा धर सुद्धा एका महत्वपूर्ण भूमिकेतून दिसेल.
हेही वाचा - इंडियन आयडॉल-१२ : अलका याग्निक व कुमार सानू यांची सांगीतिक लढाई
तब्बल सात वर्षांनंतर अमिताभ बच्चन व अजय देवगण एकत्र काम करीत आहेत.
हेही वाचा - ‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदू शर्मा ‘मेरे देश की धरती’ मधून दिसणार शेतकऱ्याच्या भूमिकेत!