मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मात्र, बॉलिवूडमधील एक अभिनेता त्यांचा खूप आवडता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर आहे. अमिताभ बच्चन यांनी त्याच्यासोबतचा एक जुना आणि एक आत्ताचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याची प्रशंसा केली आहे.
-
T 3453 - THEN and NOW .. तब और अब
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बड़ी बड़ी हैरान आँखें , RANBIR की , AJOOBA के सेट पे , Shashi जी और मेरे साथ ; और अब एक मझा हुआ सशक्त RANBIR , 'ब्रहमास्त्र' के सेट पे !!
1990 to 2020 ..
"समय चलता है अपनी समय सिद्ध चाल" pic.twitter.com/RNFR89zc43
">T 3453 - THEN and NOW .. तब और अब
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2020
बड़ी बड़ी हैरान आँखें , RANBIR की , AJOOBA के सेट पे , Shashi जी और मेरे साथ ; और अब एक मझा हुआ सशक्त RANBIR , 'ब्रहमास्त्र' के सेट पे !!
1990 to 2020 ..
"समय चलता है अपनी समय सिद्ध चाल" pic.twitter.com/RNFR89zc43T 3453 - THEN and NOW .. तब और अब
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2020
बड़ी बड़ी हैरान आँखें , RANBIR की , AJOOBA के सेट पे , Shashi जी और मेरे साथ ; और अब एक मझा हुआ सशक्त RANBIR , 'ब्रहमास्त्र' के सेट पे !!
1990 to 2020 ..
"समय चलता है अपनी समय सिद्ध चाल" pic.twitter.com/RNFR89zc43
बिग बींनी रणबीरसोबतचा ३० वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. 'अजूबा' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शशी कपूर यांच्यासोबत रणबीरने अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. तर, दुसऱ्या फोटोत आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या सेटवरील रणबीरचा लुक पाहायला मिळतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -दिशा पाटणीचा आत्तापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस डान्स, पाहा 'बागी ३'चं गाणं
अमिताभ यांनी हे दोन्ही फोटो शेअर करुन रणबीरचं कौतुक केलं आहे. १९९० ते २०२० या काळात रणबीरमध्ये बरेच बदल झाल्याचे या फोटोमधून पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ बच्चन आणि रणबीर लवकरच 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे आत्तापर्यंत बरेच अपडेट्स बिग बींनी शेअर केले आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र पडद्यावर दिसणार असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची बरीच आतुरता आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित 'झॉलिवूड' सिनेमा येणार भेटीला
मौनी रॉय, अक्कीनेनी नागार्जून, राशी मल आणि विक्रम गोखले यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
या चित्रपटाशिवाय, अमिताभ बच्चन हे 'चेहरे', 'गुलाबो सिताबो', 'झुंड' तसेच 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा -'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मधील रजनीकांत यांची दमदार झलक, पाहा प्रोमो