ETV Bharat / sitara

Big B Batting In KBC : 'केबीसी'चा सेट बनला 'क्रिकेट'चे मैदान, 'बिग बी'ची चौकार षटकारांची आतषबाजी - केबीसीत बिग बीची फलंदाजी

कौन बनेगा करोडपती 13 मध्ये या शुक्रवारी टीम इंडियाचे दोन गोलंदाज हरभजन सिंग आणि इरफान पठाण दिसणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी केबीसीचा सेट चक्क क्रिकेटच्या मैदानात परिवर्तित झाला. अमिताभ यांनी हरभजनच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.

'बिग बी'ची चौकार षटकारांची आतषबाजी
'बिग बी'ची चौकार षटकारांची आतषबाजी
author img

By

Published : Dec 17, 2021, 7:18 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांचा दोन दशक जुना असलेला टीव्ही क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' अजूनही तितकाच लोकप्रिय आहे. शोचा 13 वा सिझनही तुफान कामगिरी करत आहे. चॅनलने शोच्या शुक्रवारच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. या शुक्रवारच्या शोमध्ये टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण दिसणार आहेत.

केबीसीचे रुपांतर क्रिकेटच्या मैदानात

चॅनलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या शोची एक झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि फिरकीपटू हरभजन सिंग शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेले दिसत आहेत. इरफान पठाण शोमध्ये अमिताभ बच्चन यांना म्हणाला, 'आम्ही जगातील दिग्गज खेळाडूंसोबत खेळलो आहोत, परंतु एक दिग्गज राहिला आहे. यावर अमिताभ यांनी विचारले कोण? तर इरफान म्हणाला की तुम्ही. यानंतर शोचे रुपांतर क्रिकेटच्या मैदानात झाले.

त्याचवेळी हातात बॅट धरून अमिताभ बच्चन आपली पोझिशन घेतात आणि भज्जी दुसऱ्या टोकाला बॉलिंग करायला तयार होतो. या सामन्यात इरफान पठाण कॉमेंट्री करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सामन्यात बिग बींनी भज्जीच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला.

हरभजनने सांगितला सचिनचा किस्सा

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, भज्जी आणि इरफान शोमध्ये खेळाशी संबंधित मजेदार किस्से शेअर करताना दिसत आहेत. बिग बींनी दोन्ही खेळाडूंना विचारले की मैदानात कोणता खेळाडू तुम्हाला सर्वात जास्त घाबरतो. यावर भज्जीने सांगितले की, 1998 मध्ये सरावाच्या वेळी तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे गोलंदाजी करत होता.

भज्जीने पुढे सांगितले की, जेव्हा त्याने पहिला चेंडू टाकला तेव्हा सचिनने बचाव करून चेंडू रोखला आणि मान खाली घातली. भज्जीने सांगितले की, त्याला वाटले की सचिन त्याला मान खाली घालून बोलावत आहे. दुसऱ्या चेंडूनंतरही सचिनने हे केले तेव्हा भज्जी सचिनकडे गेला आणि पाजीला विचारले की ठीक आहे. सचिनने हो उत्तर दिले.

भज्जीने सांगितले की, त्याला नंतर कळले की डोके हलवणे ही सचिनची सवय होती आणि असे करून तो आपले हेल्मेट ठीक करतो. हा किस्सा ऐकल्यानंतर बिग बींसह सर्वजण शोमध्ये प्रचंड हसले.

हरभजन, इरफानचा बिग बीसोबत भांगडा

गंमत म्हणजे हरभजनने अमिताभ यांना भांगडा डान्स करण्यासाठी विनंती केली. हरभजन आणि इरफानचा हा आग्रह बिग बींना मोडवला नाही आणि त्यांनी बिनधास्त डान्स केला.

हेही वाचा - Priyanka Chopra Ego Hurt : 'निक जोनासची पत्नी', असा उल्लेख केल्याने भडकली प्रियंका चोप्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.