ETV Bharat / sitara

'गंगूबाई काठियावाडी'चे 'शूट रॅप-अप', भंसालींसाठी आलियाने लिहिली भावनिक चिट्ठी! - Alia Bhatt

संजय लीला भंसाली आणि आलिया भट पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. ही कथा कामठीपुरा येथील एका वेश्यागृहातील मॅडम गंगूबाई कोठेवलीच्या जीवनाभोवती फिरते आणि हुसेन जैदीच्या मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण आणि विक्रांत मेसी देखील आहेत. लॉकडाऊनमुळे याच्या चित्रीकरणात व्यत्यय आला आणि सेटबाहेरील घडणाऱ्या गोष्टींमुळेदेखील पूर्ण होण्यास उशीर झाला.

Alia Bhatt pens heartwarming note on wrap up of Sanjay Leela Bhansali’s Gangubai Kathiawadi
'गंगूबाई काठियावाडी'चे 'शूट रॅप-अप', भंसालींसाठी आलियाने लिहिली भावनिक चिट्ठी!
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:03 PM IST

Updated : Jun 27, 2021, 8:20 PM IST

संजय लीला भंसाली यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या शूटदरम्यान अनेक अडथळे आले. भंसाली आणि 'विवाद' एकाच बिल्डिंगमध्ये राहत असावेत कारण त्यांचा नवीन चित्रपट सुरु झाला की 'विवाद' त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकतो. 'गंगुबाई काठियावाडी' या संजय लीला भंसाली दिग्दर्शित आणि आलिया भट अभिनित आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला विषय हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलेला असून या मधील दाखवलेल्या गोष्टी या खोट्या असल्याचा आरोप गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी केलेला होता आणि त्यानुसार या संदर्भात माझगाव कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. त्याचा निर्णय होणे बाकी आहे म्हणूनच भंसाली आणि 'कॉंट्रोव्हर्सी' हातात हात घालून फिरतात की काय असे वाटून जाते.

संजय लीला भंसाली आणि आलिया भट पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. ही कथा कामठीपुरा येथील एका वेश्यागृहातील मॅडम गंगूबाई कोठेवलीच्या जीवनाभोवती फिरते आणि हुसेन जैदीच्या मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण आणि विक्रांत मेसी देखील आहेत. लॉकडाऊनमुळे याच्या चित्रीकरणात व्यत्यय आला आणि सेटबाहेरील घडणाऱ्या गोष्टींमुळेदेखील पूर्ण होण्यास उशीर झाला.

परंतु आता गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून तो 'पोस्ट-प्रॉडक्शन'ला जाईल. शूट 'रॅप-अप' झाल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात संजय लीला भंसाली यांना मानवंदना दिली. आलियाने आपल्या सोशल मीडियावर आपल्या 'सरांसाठी' भावनिक चिट्ठी लिहिली ज्यात या चित्रपटात काम करण्याच्या आनंददायक प्रवासाबद्दल एक सुंदर टीप सामायिक केली.

Alia Bhatt pens heartwarming note on wrap up of Sanjay Leela Bhansali’s Gangubai Kathiawadi
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे पोस्टर
आलियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'आम्ही ८ डिसेंबर २०१९ पासून गंगूबाईचे शूटिंग सुरू केले आणि आता साधारणतः २ वर्षांनंतर आम्ही हा चित्रपट पूर्ण केला. हा चित्रपट, चित्रपटाची टीम आणि शूटिंग युनिट यांनी दोन-दोन लॉकडाऊन पाहिले, अनुभवले. त्यातच दिग्दर्शक आणि कलाकारांना कोरोनाने पकडले. एकंदरीत झालेला त्रास यावर खरंतर एक फिल्म बनू शकते. परंतु या कठीण काळातून मला मिळालेला अनुभव जीवन बदलून टाकणारा आहे. (संजय) सरांच्या हाताखाली काम करणे हे माझं स्वप्नं होतं जे पूर्णत्वास गेलंय.'गेल्या दोन वर्षांतील ‘गंगुबाई’ च्या सेटवरील प्रवास अलौकिक होता आणि मी एक समृद्ध व्यक्ती म्हणून तावून सुलाखून घरी परतलीय. आय लव्ह यू सर! तुमच्यासारखा भन्नाट माणूस आणि फिल्ममेकर कुठेही नसावा. जेव्हा एखादा चित्रपट पूर्ण होतो तेव्हा तो आपल्यातील एक भाग त्याच्यासोबत घेऊन जातो. आज मी माझा एक भाग गमावला आहे. ‘गंगू’ मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझी सतत आठवण येत राहील. माझा क्रू, माझे कुटुंबीय आणि माझे प्रिय फॅन्स यांचे मनापासून आभार. तुमच्याशिवाय मी काहीच करू शकले नसते. लव्ह यू गाइज, असे देखील आलियाने म्हटलं आहे.

संजय लीला भंसाली आणि डॉ. जयंतीलाल गाडा (पेन स्टुडिओ) निर्मित, ‘गंगूबाई काठियावाडी’, देशातील सध्याची कोरोना परिस्थिती व्यवस्थित झाल्यावर चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Last Updated : Jun 27, 2021, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.