हैदराबाद - साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'RRR' रिलीज होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी ७ जानेवारीला रिलीज होणार होता. कोरोना व्हायरसमुळे चित्रपट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. पॅन इंडिया चित्रपट 'RRR' हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत अजय देवगण आणि आलिया भट्ट यांना साऊथच्या चित्रपटात पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्ट आणि अजय देवगणच्या घरी पैशांचा पाऊस पडल्याची बातमी समोर आली आहे.
१५ मिनीटांच्या रोलसाठी आलियाला मिळाली मोठी रक्कम
साउथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट 'RRR' हा मेगा बजेट प्रोजेक्ट आहे. त्यात काम करणाऱ्या मुख्य कलाकारांना भरमसाठ फी दिली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया बॉलीवूड चित्रपटासाठी जेवढे शुल्क घेते, जवळपास तेवढीच फी 'RRR' चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी घेतली आहे. या चित्रपटासाठी आलियाला ९ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
अजयची फी ऐकून आश्चर्यचकित व्हाल
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण देखील 'आरआरआर' या पॅन इंडिया चित्रपटात दिसणार आहे. मीडियानुसार, अजय देवगणने या चित्रपटासाठी फारसा वेळ घेतला नव्हता. या चित्रपटातील अजयची भूमिकाही फार मोठी नसून तो या चित्रपटात मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अजय देवगणने 35 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे एक कारण म्हणजे राजामौली हेच चित्रपट दिग्दर्शक आहेत ज्यांनी 'बाहुबली' सारखा जबरदस्त चित्रपट बनवला होता. चित्रपट रिलीज होण्यासाठी सध्याची कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
हेही वाचा - Arjun Malaika Breakup Rumours : 'अशा अफवांना जागा नाही'.. वाचा काय म्हणाला अर्जुन कपूर