ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनच्या एक्झीटनंतर 'दोस्ताना २'मध्ये झळकणार अक्षय कुमार? - अक्षय कुमार 'दोस्ताना २ चित्रपटाचा एक भाग

कार्तिक आर्यनला 'दोस्ताना २' मधून काढून टाकल्यानंतर करण जोहर विक्की कौशल आणि राजकुमार राव यांचा मुख्य भूमिकेसाठी विचार करत होता. चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या चर्चेतून वाटते की, अक्षय कुमार या चित्रपटाचा एक भाग असू शकतो.

Akshay Kumar to star in Dostana 2
'दोस्ताना २'मध्ये झळकणार अक्षय कुमार?
author img

By

Published : Apr 21, 2021, 5:56 PM IST

मुंबई - कार्तिक आर्यन 'दोस्ताना 2' मधून बाहेर पडल्यामुळे मनोरंजन जगतात खळबळ उडाली आहे. केवळ दोस्तानाच नाही तर धर्मा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातही कार्तिकला काम मिळणार नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कारण कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी २० दिवसांचे दोस्ताना २ चे शूटिंग केले आहे. हे सर्व रद्द करणे हे आर्थिकदृष्ट्या तर तोट्याचे आहेच पण दिग्दर्शक कॉलिन डिकुन्हासाठी व जान्हवीसाठीही पुन्हा मेहनत करावी लागणार आहे.

या चित्रपटाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी करण जोहरने आपला चांगला मित्र अक्षय कुमारला गळ घातली आहे. रिपोर्टनुसार करण जोहरने वैयक्तिकरित्या अक्षयला दोस्ताना 2 च्या कलाकारांमध्ये सामील होण्यासाठी विनंती केली असून या कठीण प्रसंगातून चित्रपट बाहेर काढण्यासही मदत करण्यास सांगितले आहे. अक्षयची इच्छा असेल तर मूळ स्क्रिप्टमध्येही काही बदल केले जाऊ शकतात.

यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता विक्की कौशल आणि राजकुमार राव यांच्या नावाचीही चर्चा कार्तिक आर्यनचा बदली कलाकार म्हणून सुरू होती. पण आता निर्माता एकदम हुकमी कालाकाराचा शोध घेत आहेत असे दिसत आहेत.

धर्म प्रॉडक्शन्सने १६ एप्रिल रोजी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक चिठ्टी लिहून कळवले होते की, कार्तिक यापुढे कॉलिन डिकुन्हा दिग्दर्शित 'दोस्ताना २' मध्ये काम करणार नाही. कृपया लवकरच अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.

मिळालेल्या वृत्तानुसार, निर्माते आणि अभिनेता यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि धर्मा प्रॉडक्शन्सने भविष्यात कार्तिक आर्यनशी सहयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कार्तिकच्या बाहेर पडल्यामुळे निर्मात्यांना सुमारे २० कोटींचा तोटा झाला आहे, कारण २० दिवसांचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि नव्या अभिनेत्याबरोबर पुन्हा शूट करावे लागणार आहे.

हेही वाचा - करण जोहरच्या 'दोस्ताना 2'सह सर्व चित्रपटातून कार्तिक आर्यनला डच्चू?

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.