ETV Bharat / sitara

अक्षय कुमार होणार पुन्हा भारताचा नागरिक, नेटकऱ्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया - Akshay Kumar decision

अक्षय कुमारने काही वर्षांपूर्वी कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. आता तो पुन्हा एकदा भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करतोय. मात्र, नेटकऱ्यांनी त्याला पुन्हा ट्रोल केले आहे.

Akshay Kumar
अक्षय कुमार
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:06 PM IST

नवी दिल्ली - अभिनेता अक्षय कुमारने आपले भारतीयत्व सिध्द करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे सांगत भारतीय पासपोर्ट काढण्याचा निर्णय घेतलाय. तो कॅनडाचा नागरिक असल्यामुळे त्याच्यावर अनेकवेळा टीका झाली आहे. आपण कॅनडाचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीत स्वीकारले होते याचा खुलासा त्याने केलाय. कॅनडाचे नागरिकत्व सोडून पुन्हा भारतीय नागरिकत्व स्वीकारणार असल्याचे त्याने म्हटलंय.

कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले होते सांगताना अक्षय म्हणाला, ''त्या काळात माझ्या सलग १४ फिल्म्स फ्लॉप झाल्या होत्या. त्यामुळे यातून सावरायला दुसरे काही तरी करायचे असा विचार मनात आला. माझा एक मित्र कॅनडात राहतो. त्याने मला तिथे येण्याचा सल्ला दिला. आपण मिळून काही तरी करू, असे तो म्हणाला. तोदेखील भारतीय आहे आणि कॅनडात वास्तव्यास आहे. त्यानंतर मी प्रक्रिया सुरू केली, पासपोर्ट मिळवला आणि इतरही आवश्यक गोष्टी केल्या. कारण माझे फिल्म करियर संपले, असे मला वाटत होते. मी जास्त काम करू शकेन, असे वाटत नव्हते. मात्र, १५ वा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. मी पुढे जातच राहिलो. परंतु, माझा पासपोर्ट बदलावा असे वाटले नाही.''

त्याच्यावर होत असलेल्या आरोपानंतर अक्षयने भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करायचे ठरवले आहे. त्याने जेव्हा भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करायचा आणि कॅनेडियन नागरिकत्व बदलायचे ठरवले तेव्हा पुन्हा एकदा नेटीझन्स त्याला ट्रोल करीत आहेत. अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

  • This @akshaykumar has applied for Indian passport and citizenship now that his pathetic movies are doing well at the box office.

    Make up your mind na?
    We are hitting rock bottom, you'll need the Kaneda cover.

    Hypocrisy ki bhi seema hoti hai.

    'Kya aap aam khate ho?'

    — Sidrah (@SidrahDP) December 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका नेटकऱ्याने म्हटलंय, ''अक्षय कुमारने १४ सिनेमे फ्लॉप झाले एवढ्या कारणासाठी भारताचे नागरिकत्व सोडून कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले. ( हसणारा ईमोजी ) आणि हा आम्हाला देशभक्ती शिकवणार.''..अक्षयच्या देशभक्तीवरील चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया होती.

आणिखी एकजण लिहितो, 'त्याचे दयनिय चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू लागले म्हणून त्याने भारताचे नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. तुमचे डोकं चालवा ना? हिप्पॉक्रॅसी की भी हद होती है.''

  • Jst watched Canadian @akshaykumar 's latest video where he said he applied for Canadian citizenship cause he gave 14 flops in row.Kya reason hai 😄😠
    Mean success mil nahi raha hai toh canada bhaag jao😂
    See #AbhishekBachchan & #VivekOberoi both still saying they r proud Indian😂

    — Harshada 💞 (@tweets327) December 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अशाच आशयाच्या असंख्य प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटीझन्सकडून व्यक्त केल्या जात आहेत. एकंदरीत अक्षयचा चाहता वर्ग जितका आहे, तितकाच त्याला धारेवर धरणारा वर्गही समाज माध्यमात जागृत आहे, हेच यावरून स्पष्ट होते.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.