ETV Bharat / sitara

Akshay Kumar Shiva Look : डोक्यावर जटा, गळ्यात माळा आणि निळ्या धोतरातील अक्षय कुमारचा 'महादेव' लूक व्हायरल

एका व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमार 'महादेव'च्या लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्याने निळ्या रंगाचे धोतर, ऑफ-व्हाइट कुर्ता, डोक्यावर पांघरूण आणि गळ्यात रंगीबेरंगी माळा घातलेल्या आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत शिव तांडवचा आवाज येत आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

अक्षय कुमारचा महादेव लूक
अक्षय कुमारचा महादेव लूक
author img

By

Published : Dec 17, 2021, 4:11 PM IST

हैदराबाद - अक्षय कुमार त्याच्या एकापाठोपाठ एक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. अक्षयकडे अनेक चित्रपट असून तो सतत शूटिंग करत असतो. आता अक्षय कुमार 'OMG-2' चित्रपटाच्या सेटवर दिसला. या चित्रपटाचा फर्स्ट लूक यापूर्वीच रिलीज करण्यात आला होता. अक्षयचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता OMG 2च्या सेटवरून अक्षयचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत डोक्यावर पट्टी, निळे धोतर आणि गळ्यात माळा घातलेला अक्षयचा 'महादेव' अवतार पाहण्यासाठी चाहते उतावीळ झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारने या वर्षी ऑक्टोबरमध्ये उज्जैन (मध्य प्रदेश) येथे 'OMG-2' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. याच दरम्यान अक्षयने उज्जैनमध्ये महाकालाचे दर्शनही घेतले होते. अक्षयने या शूटिंगदरम्यान अनेक मंदिरे आणि घाटांनाही भेट दिली होती.

या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय महादेवाच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याने निळ्या रंगाचे धोतर, ऑफ-व्हाइट कुर्ता, डोक्यावर पांघरूण आणि गळ्यात रंगीबेरंगी माळा घातल्या आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीत शिव तांडवचा आवाज वाजत आहे, जो त्याच्या अवतारात जबरदस्त दिसत आहे. अक्षयचा हा अवतार आता चाहत्यांना खूप आवडला आहे. अक्षय कुमार या चित्रपटात भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमारने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.

चित्रपटाची स्टारकास्ट

OMG-2 चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अरुण गोविल, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अरुण गोविल यांनी 'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारली होती, या भूमिकेमुळे ते आजही प्रसिद्ध आहेत.

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

OMG-2 व्यतिरिक्त अक्षय कुमार 'राम सेतू', 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांडे' आणि 'रक्षा बंधन' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार अलिकडेच 'सूर्यवंशी' चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट कोरोना काळानंतर थिएटरमध्ये विक्रमी प्रेक्षक खेचणारा पहिला चित्रपट ठरला होता.

हेही वाचा - Katrinas First Cooking : कॅटरिनाने पहिल्यांदा कौशल कुटुंबासाठी बनवली पंजाबी डिश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.