मुंबई - अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचा ट्रीपल धमाका असणाऱ्या 'सूर्यवंशी' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलर लॉन्चदरम्यान रणवीर सिंग तब्बल ४० मिनिटे उशिरा पोहोचला होता. त्यामुळे अक्षयने त्याची चांगलीच शाळा घेतली.
रणवीर सिंग हा सर्वांपेक्षा उशिरा ट्रेलर लॉन्चच्या ठिकाणी पोहोचला होता. अक्षयने जेव्हा त्याला यामागचे कारण विचारले, तेव्हा 'त्याने माझी बायको टाऊनला राहते', असे मजेशीर उत्तर दिले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा दीपिकाने हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा तिनेही यावर भन्नाट कमेंट देऊन रणवीरला टोला लगावला आहे.
हेही वाचा -'शांत राहा, संयम बाळगा', दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टीची प्रतिक्रिया
'मी जरी टाऊनला राहत असली, तरी मी सर्व ठिकाणी वेळेवर पोहचते', अशी कमेंट तिने दिली आहे. तिच्या या कमेंटनंतर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'सूर्यवंशी' चित्रपटात रणवीर सिंग 'सिंबा'च्या भूमिकेत एन्ट्री घेणार आहे. हा चित्रपट २४ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान अजय देवगण, अक्षय कुमारने केलं चाहत्यांना खास आवाहन