मुंबई - अभिनेता अक्षय कुमार याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. योगी आदित्यनाथ मुंबईत आहेत आणि अभिनेता अक्षय कुमारने त्याच्याबरोबर त्याच्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाची चर्चा केली.
सरकारी प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, अभिनेता अक्षयने मंगळवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
बुधवारी मुख्यमंत्री मुंबईतील अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटीगाठी घेणार आहेत. योगी आदित्य यांनी अक्षयच्या सामाजिक संदेशासह चित्रपट बनवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
त्याचबरोबर अक्षय कुमार याने योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचेही कौतुक केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की त्याने उत्तर प्रदेश राज्यात अनेक चित्रपटांचे शुटिंग केले आहे.
हेही वाचा - रकुलप्रीत सिंहने फ्लाईंग बोर्डवरील फोटो केले शेअर, चाहत्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद
उत्तर प्रदेशात फिल्म सिटी सुरू करण्याच्या प्रस्तावाबद्दल आदित्यनाथ यांनी अक्षय कुमारलाही सांगितले.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरमध्ये नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचे अनावरण केले होते. चित्रपट निर्मितीसाठी राज्यात येण्याची सिने क्षेत्रातील निर्मात्यांनीा खुली ऑफर दिली होती.
हेही वाचा - ड्रग प्रकरणात पुन्हा ट्रोल झाला भारती सिंहचा नवरा हर्ष लिंबाचिया
यूपीच्या मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सुभाष घई, बोनी कपूर, राजकुमार संतोषी, सुधीर मिश्रा, रमेश सिप्पी, तिग्मांशू धुलीया, मधुर भंडारकर, उमेश शुक्ला, टी-सिरीज प्रमुख भूषण कुमार, निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसह अनेक चित्रपट निर्माते सहभागी झाले होते.