मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार अधिक वेगाने चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या अभिनेत्याकडे सध्या दहाहून अधिक चित्रपट असून एकामागून एक चित्रपटाचे चित्रीकरण तो बिनदिक्कतपणे पूर्ण करत आहे. आता अक्षय कुमारने राम सेतू चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ सेटवरून शेअर केला आहे.
अक्षय कुमारने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की त्याने राम सेतू चित्रपट पूर्ण केला आहे आणि आज चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. या व्हिडीओसोबत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आत्ताच आणखी एक मजेशीर प्रोजेक्ट राम सेतू पूर्ण केला. चित्रपट करताना खूप काही शिकायला मिळालं, तो शाळेच्या अनुभवासारखा होता. आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे, आता फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अलीकडेच अक्षय कुमारने ऑस्करसाठी गेलेल्या सोरारई पोटरु या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक मिळवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारने चित्रपटाला होकार दिला आहे आणि आता फक्त अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे. तमिळ सुपरस्टार सुर्याने सोरारई पोटरुमध्ये वायुसेना अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट मोठा हिट ठरला होता.
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
'राम सेतू' व्यतिरिक्त अक्षय कुमारकडे 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज', 'ओएमजी 2', 'गोरखा', 'मिशन सिंड्रेला', 'रक्षाबंधन' आणि 'सेल्फी'सह 8-10 चित्रपट आहेत. येत्या दोन-तीन वर्षांत चित्रपटसृष्टी आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अक्षय कुमारच्या चित्रपटांनी भरलेला असेल.
हेही वाचा - फिटनेस सेशनमध्ये थकलेली शिल्पा शेट्टी म्हणाली 'मार डाला'!!