ETV Bharat / sitara

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचे लग्नाच्या वाढदिवसानिमित्य मजेशीर संभाषण - Twinkle khanna

ट्विंकल खन्नाने लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षय आणि ट्विंकलमध्ये अनेक मजेदार गोष्टी घडल्या आहेत. यावर अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींच्या येत आहेत. करण जोहरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना लग्नाचा वाढदिवस

author img

By

Published : Jan 17, 2022, 1:17 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे सुंदर जोडपे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला सोमवारी (17 जानेवारी) 21 वर्षे पूर्ण झाली. ट्विंकल आणि अक्षयने २००१ साली लग्न केले होते. यानिमित्ताने ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री आणि लेखिका असलेल्या ट्विंटकलने एक फोटो देखील पोस्ट केला आहे, जो खूप सुंदर आहे.

या फोटोत अक्षय कुमार खुर्चीवर बसला असून त्याची पत्नी ट्विंकल देखील कॅज्युअल लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे. हा फोटो रणथंबोर नॅशनल पार्कमधील आहे. इथे हे जोडपे त्यांची मुलगी नितारासोबत सुट्टीसाठी पोहोचले आहे.

हा फोटो शेअर करत ट्विंकलने तिचा पती अक्षयसोबत घडलेल्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. ट्विंकलने लिहिले, 'आमच्या 21 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमच्यात संभाषण झाले...... मी : ''तुला माहिती आहे, आपण इतके वेगळे आहोत की आम्ही जर एखाद्या पार्टीत भेटलो तर मला माहिती नाही की तुझ्याशी बोलू शकेन की नाही.''

तो : मी तुझ्यासोबत नक्की बोलेन.

मी : मला आश्चर्य का वाटत नाही, मग असे काय आहे? तू मला विचारशील का?

तो : नाही.. तसे नाही, मी म्हणेन, 'भाभी जी, भाई साहब कैसे हैं, बच्चे ठीक हैं? ठीक है नमस्ते'."

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना लग्नाचा वाढदिवस
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना लग्नाचा वाढदिवस

या खास प्रसंगी अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो त्याची मुलगी नितारासोबत गायीला चारा देत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, 'मातीचा सुगंध, गाईला चारा देणे, झाडांची थंड झुळूक... आपल्या मुलीला हा सर्व अनुभव देण्यात एक वेगळाच आनंद आहे. आता फक्त उद्या तिला जंगलात वाघ दिसला तर ते केकवर आयसिंग होईल! रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये फिरत आहोत, अशा अतुलनीय ठिकाणांसाठी देवाचे आभार.''

हेही वाचा - Birthday Celebrity Director Kedar Shinde : "50 टक्के प्रेक्षकांमध्ये काम करावं, हे निर्बंध विनोदी" दिग्दर्शक केदार शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.