ETV Bharat / sitara

'गंगूबाई काठियावाडी'मध्ये शक्तीशाली भूमिकेत झळकणार अजय देवगण - संजय लीला भन्साळी बाजीराव मस्तानी

अभिनेता अजय देवगण चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळींच्या आगामी गंगूबाई काठियावाडीच्या स्टारकास्टमध्ये सामील झाला आहे. भन्साळींच्या चित्रपटात तो डॉनची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त शेवटच्या क्षणापर्यंत गोपनिय ठेवण्यात आले होते. त्याच्या भूमिकेचा तपशील मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Gangubai Kathiawadi
गंगूबाई काठियावाडी
author img

By

Published : Feb 5, 2021, 3:11 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शन करणार असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट गंगुबाईची भूमिका साकारणार असल्याचे यापूर्वीच निश्चित झाले होते. आता या स्टारकास्टमध्ये अजयचा समावेश झाला आहे.

अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी बाजीराव मस्तानी या चित्रपटात एकत्र येणार होते. मात्र अजयच्या इतर जबाबदारीमुळे ते शक्य झाले नव्हते. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. मात्र गेली २० वर्षे ते एकत्र आलेले नाहीत. आता भन्साळींच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात भूमिका करण्याचे अजय देवगणने मान्य केले आहे. यात त्याची भूमिका छोटी असली तरी खूप प्रभावी असणार आहे.

Gangubai Kathiawadi
'गंगूबाई काठियावाडी' पोस्टर

या चित्रपटामध्ये ५१ वर्षीय अभिनेता अजय देवगण रिअल-लाइफ अंडरवर्ल्ड डॉन म्हणून काम करत असल्याचे सांगितले जात आहे. एका वेबलोइड अहवालात अजयच्या भूमिकेचे वर्णन "लहान आणि शक्तिशाली" असे करण्यात आले आहे.

एका वेश्यागृह मालक आणि मातृसृष्टीभोवती फिरणाऱ्या चित्रपटात आलिया एक माफिया राणीची भूमिका साकारताना दिसणार आहे, जिला कामठीपुराची मॅडम देखील म्हटले जायचे. गंगूबाई काथियावाडी हा चित्रपट द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक जेन बोर्जेस यांनी केलेल्या मूळ संशोधनात हुसेन जैदी यांनी लिहिलेले आहे.

हेही वाचा - 'शेतकरी आंदोलनाबाबत योग्य तो निर्णय व्हावा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.