ETV Bharat / sitara

अजय देवगणने बिग बींना शुभेच्छा देऊन शेअर केला 'मेडे' लूक - अजय देवगणच्या अमिताभला सदिच्छा

अजय देवगण आणि अमिताभ बच्चन 'मेजर साहब', 'खाकी', 'हम किसी से कम नहीं', 'हिंदुस्तान की कसम' आणि 'सत्याग्रह' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्य अजय देवगणने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अजय देवगणने बिग बींना शुभेच्छा देऊन शेअर केला 'मेडे' लूक

author img

By

Published : Oct 11, 2021, 8:13 PM IST

मुंबई - शतकातील महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींचा जन्म 1942 मध्ये प्रयागराज (अलाहाबाद) उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्य बॉलिवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. बच्चन यांना सह-कलाकार अजय देवगण आणि गायक अदनान सामी यांनी सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजय आणि अदनान दोघांनी अभिनंदन संदेशांसह दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.

अजय देवगणच्या सदिच्छा

बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणने बिग बींना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्विटरवर दिल्या आहेत त्याने लिहिलंय, 'सर, तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहून खरा कलकार कसा असावा याची मला शिकवण मिळते. अमित जी.' अजयने बच्चन यांचे अभिनंदन करीत एक फोटोही शेअर केलाय. हा फोटो त्यांच्या आगामी 'मे डे' चित्रपटातील आहे. अजय आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यात 'मेजर साहब', 'खाकी', 'हम किसी से कम नहीं', 'हिंदुस्तान की कसम' आणि 'सत्याग्रह' या चित्रपटांचा समावेश होतो.

अदनान सामीने बच्चन यांना शुभेच्छा दिल्या

'मुझको भी तो लिफ्ट करा दे' हे 90 च्या दशकातील लोकप्रिय गाणे आजही लोक क्वचितच विसरले असतील. या ब्लॉकबस्टर गाण्यात अदनान सामी आणि अमिताभ बच्चन यांची जोडी पहिल्यांदाच दिसली होती. गायक अदनान सामीने या गाण्याचे काही फोटो शेअर केले आणि बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ''तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आणि खूशीसाठी प्रार्थना करतो.'', असे त्याने लिहिलंय. अदनानने एक फोटो शेअर केला असून यात तो बिग बीसोबत उभा असलेला दिसतो.

हेही वाचा - स्वतःसोबत फोटो काढण्यासाठी बिग बी यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम कडे घातली गळ!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.