ETV Bharat / sitara

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'थँक्स गॉड'चे शूटिंग सप्टेंबरमध्ये - अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​

ऑगस्टमध्ये अक्षय कुमारचा बेल बॉटम या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. याच पावलावर पाऊल टाकत अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनीही आपल्या शूटिंगला सुरूवात करण्याचे ठरवले आहे. अजय आपले शूटींग सप्टेंबर महिन्यात सुरू करणार आहे.

Ajay Devgn, Sidharth Malhotra
अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:34 PM IST

मुंबई - अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​आपल्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटासाठी शूटिंगला सुरूवात करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घेता येईल याच्या योजनेवर अजय विचार करीत आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात सप्टेंबरमध्ये शूटिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.

इंद्र कुमार दिग्दर्शित हा विनोदी चित्रपट सॉर्ते कुगलर या डॅनिश चित्रपटाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. कित्येक वर्षांपासून इंद्रकुमार या प्रकल्पाची पटकथा लिहित आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण 10 एप्रिलपासून सुरू होणार होते, पण सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे वेळापत्रक सप्टेंबरमध्ये वाढविण्यात आले आहे.

हा चित्रपट समाज सुधारण्यासाठी बाहेर पडलेल्या दोन सुसंस्कृत, वेड्या माणसावर आधारित आहे. अजय आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​व्यतिरिक्त 'थँक्स गॉड' या चित्रपटात अजयच्या 'दे दे प्यार दे' चित्रपटातील सह-कलाकार रकुल प्रीत सिंग देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा - गलवान व्हॅलीच्या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार अजय देवगण

गेल्या वर्षी टोटल धमाल या चित्रपटाने १५० कोटी रुपयांचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. त्यानंतर अजय आणि इंद्र कुमार यांनी आगामी चित्रपट विनोदी असणार हे जाहीर केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.