मुंबई - सुपरस्टार अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची प्रिय मुलगी, न्यासा देवगण नेहमीच चर्चेपासून दूर राहिली आहे.न्यासाचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी असतानाही तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसते. यात ती बॉलिवूडच्या गाजलेल्या गाण्यावर वर्गमित्रांसह थिरकताना दिसत आहे.
स्टार किड्स नेहमीच हौशी फोटोग्राफर्सच्या निशाण्यावर असतात. यांच्यासंबंधी सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट चर्चेत असते. सिंगापूरमधील दक्षिण पूर्व आशियाच्या युनाइटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकत असलेली न्यासा देवगण प्रसिध्दीपासून स्वतःला दूर ठेवत असते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये, न्यासा एका इव्हेंटमध्ये तिच्या वर्गमित्रांसह नाचताना दिसते. बोले चुडियाँ', 'सज्दा', 'तेरे नैना' आणि 'नगाडा' या गाण्यावर त्यांनी धमाल डान्स केला. यावेळी तिने पांढरा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
२०१९ मध्ये काजोलला न्यासा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याबद्दल विचारले होते. त्यावेळी काजोलने तिला अजून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे उत्तर दिले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ‘कमांडो ४’सह फ्रँचायझीला नव्या उंचीवर नेऊ - विपुल शाह