मुंबई - बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणने चाहत्यांना खूशखबर दिली आहे. अजयने गुरुवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने आपल्या 'दृश्यम-2' चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचे सांगितले आहे. अजयने चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलही सांगितले आहे. 'दृश्यम' हा साऊथचा सुपरस्टार मोहनलालचा मल्याळम चित्रपट 'दृश्यम' (2013) चा हिंदी रिमेक आहे.
अजयने शेअर केली पोस्ट
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'दृश्यम 2' च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाला वाचवू शकेल का? 'दृश्यम 2'चे शूटिंग सुरू झाले. अजयने सेटवरून जो फोटो शेअर केला आहे त्यात तो त्याच्या विजयच्या व्यक्तीरेखेत आहे. या फोटोत अजयसोबत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री श्रिया सरन आणि चित्रपट निर्माते अभिषेक पाठक देखील दिसत आहेत.
अजयने या पोस्टमध्ये अभिनेत्री तब्बूलाही टॅग केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. अशा परिस्थितीत ती पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहे.
'दृश्यम' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता
अजय देवगणच्या पहिल्या 'दृश्यम' (2015) ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. चित्रपटाला मिळालेले यश पाहून अजयने या चित्रपटाच्या सिक्वेलला ग्रीन सिग्नल दिला होता.
अजय देवगणचे आगामी चित्रपट
याआधी अजयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून 'सिंघम-3' चित्रपट लवकर सुरू होण्याचे संकेत दिले होते. याशिवाय अजय देवगण एसएस राजामौलीचा पॅन इंडिया चित्रपट 'RRR' आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातही दिसणार आहे
हेही वाचा - Bappi Lahiri Last Rites : बप्पी लाहिरी अनंतात विलीन, विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार