ETV Bharat / sitara

वडिलांच्या निधनानंतर अजयचे ट्विट, म्हणाला... - tweet

या कठीण काळात बॉलिवूड कलाकार आणि अजयचे जवळचे अनेक मित्र त्याच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. याप्रसंगाचे अनेक व्हिडिओही समोर आले होते.

वडिलांच्या निधनानंतर अजयचे ट्विट
author img

By

Published : May 31, 2019, 1:40 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक आणि अजय देवगणचे वडिल वीरू देवगण यांचं प्रदीर्घ आजारानं सोमवारी निधन झालं. वीरू देवगण यांच्या निधनानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन अजय आणि काजलचं सांत्वन केलं. या सर्व कलाकारांसाठी आता अजयने एक ट्विट केलं आहे.

तुम्ही सर्वांनी आमच्या दुःखात ज्याप्रमाणे आम्हाला साथ दिली त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार, असे ट्विट करत अजयने सर्व कलाकारांचे आभार मानले आहेत. या कठीण काळात बॉलिवूड कलाकार आणि अजयचे जवळचे अनेक मित्र त्याच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. याप्रसंगाचे अनेक व्हिडिओही समोर आले होते.

अजयच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत अनेकांनी वीरू देवगण यांना श्रद्धांजली वाहिली. वीरू देवगण हे सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये ८० हून अधिक चित्रपटांसाठी अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक उत्तम अॅक्शन दिग्दर्शक गमावला आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.