मुंबई - बॉलिवूडमधील आघाडीचा गायक मिका सिंग याने 8 ऑगस्टला पाकिस्तानातील एका हाय प्रोफाईल व्यक्तीच्या कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मिकाने देशप्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिल्याने त्याच्यावर हा बहिष्कार टाकण्यात आल्याचं असोसिएशनने म्हटलं होतं. अशात आता या असोसिएशनच्या कामगारांनी मिकाच्या घराबाहेर त्याच्या या कृतीचा निषेध करत निदर्शने केली आहे.
काही लोकांनी त्याच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्यावर भारत माता की जय, देशाहून मोठा पैसा नसतो, मिका पाकिस्तानात परत जा, पाकचा मिका, मिकाचा पाक...अशा प्रकारचा मजकुर त्यावर लिहिला आहे. एका निदर्शकानं या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, देशानं त्याला दिलेलं प्रेम पुरेस नव्हतं का? तर एकानं म्हटलं, ८ ऑगस्टला मिकानं कराचीमध्ये परफॉर्मन्स केला. याठिकाणी त्याला इतर कोणी नाही, तर परवेज मुशर्रफ यांनी आमंत्रित केलं होतं. मुशर्रफमुळे कारगिल युद्ध झालं आणि ज्यात अनेक जवानांना वीरमरण आलं.
-
Mumbai: Members of All Indian Cine Workers Association (AICWA) protest against singer Mika Singh, for performing in Pakistan. pic.twitter.com/Adq1YGMyRP
— ANI (@ANI) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Members of All Indian Cine Workers Association (AICWA) protest against singer Mika Singh, for performing in Pakistan. pic.twitter.com/Adq1YGMyRP
— ANI (@ANI) August 19, 2019Mumbai: Members of All Indian Cine Workers Association (AICWA) protest against singer Mika Singh, for performing in Pakistan. pic.twitter.com/Adq1YGMyRP
— ANI (@ANI) August 19, 2019
काय आहे संपूर्ण प्रकरण -
मिकाने पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयाच्या लग्नात हजेरी लावून परफॉर्म केलं होतं. ही बाब उघड झाल्यानंतर, बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या ‘ऑल इंडिया सिने एप्लॉईज असोसिएशन’ आणि ‘वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज असोसिएशन’ या दोन्ही संघटनांनी स्वतंत्र पत्रक काढून मिकावर बहिष्कार घालण्याचं आवाहन संपूर्ण इंडस्ट्रीला केलं आहे. त्यानुसार त्याच्यासोबत कोणतंही काम न करायची ताकीद संबंधित प्रॉडक्शन हाऊस, म्यझिक कंपनी, निर्माते, दिग्दर्शक यांना देण्यात आली आहे. त्याच्यासोबत सुरू असलेली सर्व कामे रद्द करण्याची विनंती म्युझिक कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध चिघळलेले असताना आणि मायभूमीच्या रक्षणासाठी अनेक जवान सीमेवर शहीद होत असताना देशापेक्षा पैशाला महत्त्व दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं या दोन्ही संघटनांनी स्पष्ट केलं आहे.