ETV Bharat / sitara

'सुर्यवंशी'च्या यशानंतर रोहित शेट्टीने सांगितला 'सर्कस' रिलीजचा प्लान - 'सर्कस' रिलीज

सूर्यवंशीच्या (Sooryavanshi) प्रचंड यशानंतर, चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने (filmmaker Rohit Shetty )त्याच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा सर्कस (Cirkus) हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. रोहित शेट्टी म्हणाला की, रणवीर सिंगची (Ranveer Singh)भूमिका असलेल्या सर्कस चित्रपटाला प्रदर्शनासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सिम्बा आणि सूर्यवंशी (Simmba and Sooryavanshi) नंतर सर्कस हा शेट्टीचा रणवीर सिंहसोबतचा तिसरा चित्रपट असेल.

'सर्कस' रिलीजचा प्लान
'सर्कस' रिलीजचा प्लान
author img

By

Published : Nov 24, 2021, 7:24 PM IST

मुंबई (महाराष्ट्र): चित्रपट निर्माते रोहित शेट्टी (Filmmaker Rohit Shetty )म्हणाला की त्याला त्याच्या आगामी कॉमेडी चित्रपट सर्कस (Cirkus) च्या रिलीजची तारीख जाहीर करण्याची घाई नाही. कारण त्याला फिल्म उद्योगातील अगोदरचा अनुशेष दूर करायचा आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर, अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्या भूमिका असलेला रोहित शेट्टीचा अॅक्शन-ड्रामा 'सूर्यवंशी' (Shetty's action-drama Sooryavanshi) हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा हिंदी चित्रपट होता.

कोरोनाव्हायरस साथीमुळे 5 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी 19 महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागलेल्या सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांच्या सोलो रनचा आनंद लुटला. या काळात कोणताही हिंदी चित्रपट रिलीज झाला नाही. 'सुर्यवंशी'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 180 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

रोहित शेट्टी म्हणाला की रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या सर्कसला रिलीज होण्यासाठी योग्य विंडोची प्रतीक्षा करावी लागेल. कोरोनामुळे गेली दिड वर्षे मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले नाही. अनेक चित्रपटांना प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चित्रपटांचा मोठा बॅकलॉग बाकी आहे.

याविषयी बोलताना रोहित म्हणाला, "फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतका बॅकलॉग बाकी आहे की मला त्यात उडी मारायची नव्हती. शिवाय, मी सूर्यवंशी घेऊन आलो तेव्हा दोन आठवडे कोणीही निर्मात्याने न येता सहकार्य केले. लोक माझ्याशी भांडू शकत होते किंवा पुढच्या आठवड्यात येऊ शकले असते. पण त्यांनी मला सहकार्य केले. कारण मी इतका वेळ माझ्या चित्रपटासाठी प्रतीक्षा करीत होतो."

'सर्कस' रिलीजचा प्लान
'सर्कस' रिलीजचा प्लान

"आता माझी पाळी आहे. जेव्हा मला विंडो मिळेल तेव्हा मी सर्कस रिलीज करेन. ज्या दिवशी मी सूर्यवंशी (रिलीज डेट) जाहीर केली त्या दिवशी मी सर्कसचीही घोषणा करू शकलो असतो, पण ते योग्य ठरले नसते," असे दिग्दर्शक म्हणाला.

सिम्बा आणि सूर्यवंशी नंतर सर्कस हा शेट्टीचा सिंहसोबतचा तिसरा चित्रपट असेल. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या द कॉमेडी ऑफ एरर्स या क्लासिक नाटकावर आधारित आहे, जो जन्मावेळी चुकून विभक्त झालेल्या समान जुळ्या मुलांच्या जीवनाभोवती फिरतो.

सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी सारखे बिग बजेट कॉप युनिव्हर्स चित्रपट बनवण्याआधी, 'सर्कस'सह, 'गोलमाल पार्ट एक' आणि 'ऑल द बेस्ट'च्या विनोदी काळात प्रेक्षकांना परत घेऊन जाण्याचा शेट्टीचा मानस आहे.

सर्कसमध्ये पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा आणि व्रजेश हिरजी यांच्याही भूमिका आहेत. 2 डिसेंबरला उटीमध्ये चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलसाठी टीम रवाना होणार आहे.

हेही वाचा - विजय देवराकोंडाच्या भेटीसाठी रश्मिका मंदान्ना अमेरिकेला रवाना? पाहा फोटो..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.