ETV Bharat / sitara

आदित्य रॉय कपूर बनला स्वत:ची '3डी बोलकी बाहुली' असलेला पहिला अभिनेता ! - बोलक्या बाहुल्यासह सत्यजीत आणि आदित्य

‘लूडो’ या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’ दाखवण्यात आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवली आहे. 3डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसारखी दिसणारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर आपली स्वत:ची अशा पध्दतीच 3डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

Aditya Roy Kapoor
आदित्य रॉय कपूर
author img

By

Published : Nov 28, 2020, 6:59 PM IST

मुंबई - फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘लुडो’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र वाखाणणी होत आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’ दाखवण्यात आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवली आहे. 3डी प्रिंटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसारखी दिसणारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर आपली स्वत:ची अशा पध्दतीच 3डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

Satyajit and Aditya with talking dolls
बोलक्या बाहुल्यासह सत्यजीत आणि आदित्य

याविषयी अधिक माहिती देताना शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हणतात, “अनुराग बासु ह्यांना आम्ही हुबेहुब दिसणाऱ्या बाहुल्या बनवू शकतो, याविषयी माहिती होती. ते आमच्याकडे आले असता, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते.”

हेही वाचा - मनीष पॉलने सुरू केले 'जुग जुग जियो'चे शूटिंग

शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांच्या कलेत 53 वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही 2200 पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर इंडियाज गॉट टॅलेंट, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शोमध्येही दिसले आहेत.

सत्यजीत सांगतात, "आदित्यची 3डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा 3 डी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही 3 डी फोटो काढले. आणि मग त्यानुसार, आम्ही फायनल 3डी प्रिंटेड बाहुली तयार केली. आदित्यच्या या बाहुलीचं वैशिष्ट्य ठेवायचं होतं, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेह-यावरचं लांबसडक नाक. “

Satyajit and Ramdas Padhye with Aditya's doll
आदित्यच्या बाहुल्यासह सत्यजीत आणि रामदास पाध्ये

ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पापण्या ह्यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये ह्यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले.

हेही वाचा - चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजेभोसले यांची हकालपट्टी; अविश्वास ठराव मंजूर

ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतात, “आदित्यच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तो मन लावून ही कला आत्मसात करण्यामध्ये लक्ष द्यायचा. मी त्याच्या घरी त्याला शिकवायला जायचो. शब्दभ्रमकार बनण्याचे तंत्रशुध्द शिक्षण आदित्यने खूप लवकर शिकले. शूटिंगच्या दरम्यान मदतीसाठी मी उपस्थित होतो. पण मला सांगायला आनंद वाटतो, की, आदित्यने अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवलीय. “

Satyajit and Aditya with talking dolls
बोलक्या बाहुल्यासह सत्यजीत आणि आदित्य

आदित्य रॉय कपूरने सत्यजीतला फिल्मनंतर मेसेज करत त्याचे आभार मानले आहेत. आदित्यने म्हटलंय, “या चित्रपटातल्या माझ्या भुमिकेच्या तयारीसाठी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या वडिलांना (रामदास पाध्ये) यांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल अशी आशा आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.