ETV Bharat / sitara

'शकुंतला देवी' च्या प्रदर्शनाआधी, विद्या बालनची सर्व भारतीय मुलींसाठी खास कविता - daughters of India

अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी 'शकुंतला देवी' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी भारतातील सर्व मुलींसाठी एक कविता समर्पित केली आहे. सुंदर मोनोक्रोमवर चित्रित करण्यात आलेल्या या कवितेला विद्याने सुंदरपणे सादर केले आहे

विद्या बालन
विद्या बालन
author img

By

Published : Jul 30, 2020, 9:33 AM IST

मुंबई - अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी 'शकुंतला देवी' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. येत्या ३१ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी भारतातील सर्व मुलींसाठी एक कविता समर्पित केली आहे. सुंदर मोनोक्रोमवर चित्रित करण्यात आलेल्या या कवितेला विद्याने सुंदरपणे सादर केले आहे.

प्रत्येक मुलीने निडर आणि सशक्त व्हावे. आपल्या वाटेतल्या सर्व काचांना दूर करून जावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वतःवर अढळ विश्वास ठेवावा. प्रत्येक महिलेने स्वतःला प्राथमिकता द्यावी, असा संदेश विद्याने या कवितेच्या माध्यमातून मुलींना दिला आहे.

या चित्रपटामध्ये विद्या बालनचा लूक तिच्या मागील चित्रपटांपेक्षा एकदम वेगळा आहे. सिनेमात 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा, अमित साध मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'ह्युमन कॉम्युटर' नावाने प्रसिद्ध गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्टर शकुंतला देवी यांच्या व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांनी आयुष्यात मिळवलेलं यश हा प्रवास सिनेमात उलगडला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.