ETV Bharat / sitara

आर्यनसारख्या मुलांऐवजी खुनी, बलात्काऱ्यांना पकडण्यावर भर द्यावा - सोमी अली - सोमी अलीने दिले आर्यनला समर्थन

शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात अटक झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ह्रतिक रोशनसह अनेकांनी आर्यनला उघड पाठिंबा दर्शवलाय. याच यादीत आता सलमान खान याची कथित एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा देखील समावेश झाला आहे.

सोमी अलीने दिले आर्यनला समर्थन
सोमी अलीने दिले आर्यनला समर्थन
author img

By

Published : Oct 8, 2021, 8:01 PM IST

मुंबई - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणात अटक झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमधील स्टार्स ड्रगचे सेवन करतात यावर बराच उहापोह झाला. काही ड्रग पेडलर्स पकडले गेले, काही स्टार्सच्या घरावर छापे पडले. आता स्टार किड्सही या व्यसनाच्या आहारी गेल्याची चर्चा आहे.

आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख आणि गौरी यांना पाठिंबा देणाऱ्या स्टार्सची संख्याही मोठी आहे. ह्रतिक रोशनसह अनेकांनी आर्यनला उघड पाठिंबा दर्शवलाय. याच यादीत आता सलमान खान याची कथित एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा देखील समावेश झाला आहे.

सोमी अलीने दिले आर्यनला समर्थन

अभिनेत्री सोमी अलीने एक पोस्ट लिहून खळबळ उडवून दिली आहे. तिचे म्हणणे आहे की ड्रग सेवन करणे ही गोष्ट इतके महत्त्व देण्याची नाही. इथे या प्रकरणाला जास्त महत्त्व दिले जाते आहे. आपणही 15 वर्षाची असताना ड्रग सेवन केले होते असा खुलासाही तिने केलाय. या पोस्टमध्ये तिने आर्यन खानची उघड बाजू घेतली असून तो यात दोषी नसल्याचे तिला वाटते.

यंत्रणा बलात्कारी आणि मारेकऱ्यांना पकडण्यावर लक्ष केंद्रीत का करत नाही?"

"आजच्या काळात कोणत्या मुलाने ड्रगचे सेवन केलेले नाही? हे मला सांगा. त्यामुळे या मुलांना सोडून द्यायला हवे. ड्रगचे व्यसन हे वेश्यागमनाप्रमाणे आहे, ही सवय सहजी सुटत नाही. याचा खोलवर विचार केला पाहिजे. या प्रकरणात मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. येथे कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, हे ध्यानात घ्या. मी १५ वर्षांची असताना गांजाचे सेवन केले होते. त्यानंतर आंदोलन सिनेमाच्या सेटवर मी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबतही ड्रग्ज घेतले होते. याबद्दल मला कोणताही पश्चाताप वाटत नाही," अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री सोमी अलीने आपल्या इन्स्टाग्रामवर केली आहे.

तिने पुढे लिहिलंय, "न्याय्य व्यवस्था आर्यनचा उपयोग एक मुद्दा सिद्ध करण्यासाठी करत आहे पण याचा विनाकारण त्रास त्याला सहन करावा लागत आहे. त्याऐवजी यंत्रणा बलात्कारी आणि मारेकऱ्यांना पकडण्यावर लक्ष केंद्रीत का करत नाही?"

"अमेरिका 1971 पासून ड्रगविरुद्ध युद्ध लढत आहे आणि तरीही आज तिथे ड्रग सहज उपलब्ध होत असते.

"शाहरुख आणि गौरी यांच्यासाठी मला मनापासून वाईट वाटतंय आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते. आर्यन तू चुकीचा वागलेला नाहीस आणि बाळ तुला न्याय मिळेल.", अशा आशयाची पोस्ट सोमी अलीने लिहिली आहे.

हेही वाचा - ह्रतिक रोशनने आर्यन खानबद्दल पोस्ट लिहिताच कंगना म्हणते, "आता सर्व माफिया पप्पू ..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.