ETV Bharat / sitara

‘लूप लपेटा’ मध्ये अभिनेत्री श्रेया धन्वंतरी महत्वाच्या भूमिकेत! - tapsee pannu new movie

‘स्कॅम १९९२’ आणि ‘फॅमिली मॅन’ या दोन्ही सिरीजनंतर श्रेया धन्वंतरी ही तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन बरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात तिची महत्वाची भूमिका आहे.

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी
अभिनेत्री श्रेया धन्वंतरी
author img

By

Published : Jul 2, 2021, 12:47 PM IST

मुंबई - गेल्या दोन ते तीन वर्षांत ओटीटी माध्यमाच्या वाढत्या उदयामुळे विविध पध्दतीचा आशय निर्माण होत आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी नवीन आशय तसेच नवीन कलाकारांनाही संधी मिळत आहे. सध्या वेब-सिरीज माध्यमात स्टारडम न पाहता अभिनयाच्या कुवतीवर रोल दिले जात आहेत. ‘स्कॅम १९९२’ आणि ‘फॅमिली मॅन’ या दोन्ही सिरीजनंतर श्रेया धन्वंतरी ही तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन बरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी
अभिनेत्री श्रेया धन्वंतरी

सावी आणि सत्या यांच्या भूमिकांशी जुळण्यासाठी निर्माते लोकप्रिय ॲक्टरच्या शोधात होते. याआधीही एलिप्सिस एंटरटेनमेंट बरोबर काम केल्यामुळे निर्मात्यांना श्रेयाच्या अभिनय कौशल्याची प्रचिती होतीच. आणि त्यामुळेच त्यांनी जुलियाच्या भूमिकेसाठी श्रेयाची निवड केली. "मी माझे अभिनयातील काम तनुज आणि अतुल यांच्यासोबत केले होते. ‘लूप लपेटा’ या चित्रपटातील व्यक्तिरेखा इतकी रंजक आहे. त्यामुळे की मला नाकारता आली नाही. या चित्रपटाचे शीर्षकसुद्धा आकर्षक आहे. मला नेहमीच काही वेगळे काम करायचे होते." सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिप्सिस एंटरटेनमेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर), आयुष महेश्वरी द्वारा निर्मित आणि आकाश भाटिया दिग्दर्शित ‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

लूप लपेटा
लूप लपेटा

हेही वाचा - सोशल मीडियावर सकारातमकता पसरविण्यासाठी अनन्या पांडेचे 'सोशल मीडिया फॉर सोशल गुड' कॅम्पेन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.