ETV Bharat / sitara

TMC MP अभिनेत्री नुसरत जहांला पुत्ररत्न; पती निखिल जैन म्हणाले होते, हे बाळ माझे नाही - अभिनेत्री नुसरत जहां बातमी

अभिनेत्री आणि तृणमूल पक्षाच्या खासदार नुसरत जंहा हिला मुलगा झाला आहे. आजच नुसरत जहांला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

actress Nusrat Jahan delivered a baby boy
अभिनेत्री नुसरत जहांला मुलगा झाला
author img

By

Published : Aug 26, 2021, 1:52 PM IST

Updated : Aug 26, 2021, 2:54 PM IST

नवी दिल्ली - अभिनेत्री आणि तृणमूल पक्षाच्या खासदार नुसरत जंहा हिला मुलगा झाला आहे. आजच नुसरत जहांला डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या एमआयटीमधील वेबिनावरून वादंग, विद्यार्थी संघटनांचा विरोध

बंगाली सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार असलेल्या नुसरत जहां गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत आहे. ती गर्भवती असताना तिने आपल्या बेबी बंपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून नुसरत चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक व्हिडिओ क्लिपही चर्चेत आली होती. यात ती अंडरवॉटर बेबी बंप फ्लाँट करताना दिसत होती.

तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केले होते

नुसरत जहांच्या फोटोंनी सोशल मीडियावर वादळ निर्माण केले होते. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नुसरत जहां नेव्ही ब्ल्यू कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली. तसेच, ती स्मोकी मेकअपमध्येही बरीच सुंदर दिसत होती. नुसरतचा हा ग्लॅमरस अवतार आणि पाण्याखाली दिलेल्या वेगवेगळ्या पोजला चाहत्यांनी पसंती दर्शवली होती.

actress Nusrat Jahan delivered a baby boy
अभिनेत्री नुसरत जहां

खासदार नुसरत यांनी निखिल जैनवर केले आहेत आरोप

अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री, तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां हिच्या विवाहाची चर्चा आहे. निखिल जैनसोबत कोणतेही वैवाहिक संबंध नसून त्याच्यापासून विभक्त होत असल्याचे नुसरत जहांने सांगितले होते. 2019 मध्ये दोघांनी केलेले लग्न अवैध असल्याचा मोठा खुलासाही तिने केला होता. पैशांचा दुरुपयोग, दागिने आणि अन्य संपत्ती अवैधरित्या निखिलने घेतली असल्याचाही आरोप नुसरतने केला होता.

लग्न ठरले अवैध...

निखिल आणि नुसरत यांचे लग्न तुर्की विवाह नोंदणी अंतर्गत झाले होते. हे लग्न दोन वेगवेगळ्या धर्मीय लोकांचे होते. त्यामुळे, सामाजिक विवाह कायद्यानुसार लग्नाची अधिकृत नोंदणी गरजेची होती. नोंदणी न झाल्याने तुर्कीत पार पडलेल्या लग्नाला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे, घटस्फोट घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे नुसरतने सांगितले होते. तसेच, आतापर्यंत आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो, असेही तिने सांगितले होते. नुसरत गर्भवती असल्याचे वृत्त बाहेर आल्यावर जैन यांना यासंदर्भात विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हा गर्भ माझा नसल्याचे वक्तव्य केले होते.

स्टायलिश खासदार म्हणून नुसरतची ओळख

नुसरतने अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश घेतल्याने तिला संसदेतील स्टायलिश खासदार म्हणून ओळखल्या जाते. तिच्या सौंदर्याची आणि स्टाईल स्टेटमेंटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. उद्योगपती असलेल्या निखिल जैनशी 'तुर्की' येथे नुसरतने 19 जून 2019 ला लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हारल झाला होता. लग्नानंतर नुसरत आणि निखिल यांचा रिसेप्शन सोहळा 4 जुलैला कोलकातामध्ये पार पडला होता. मात्र, हे लग्न अवैध नसल्याचे माहिती झाल्याने चाहत्यांना धक्का बसला.

हेही वाचा - मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण

Last Updated : Aug 26, 2021, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.