ETV Bharat / sitara

B'day Spl: आरसपाणी सौंदर्याचं मूर्तीमंत उदाहरण 'मधुबाला' - dilip kumar

आपल्या मनमोहक हास्याने आणि निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकविणाऱया मधुबाला यांचा आज ८६वा वाढदिवस आहे. सोंदर्यांचं मुर्तीमंत उदाहरण असलेल्या मधुबाला यांचा १४ फेब्रुवारी १९३३साली जन्म झाला होता. योगायोग म्हणजे १४ फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणजेच प्रेमाचा दिवसही मानला जातो. त्यामुळेच कदाचित मधुबाला एवढ्या रोमॅन्टिक असाव्यात.

मधुबाला
author img

By

Published : Feb 14, 2019, 9:53 AM IST

आपल्या मनमोहक हास्याने आणि निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकविणाऱया मधुबाला यांचा आज ८६वा वाढदिवस आहे. सोंदर्यांचं मुर्तीमंत उदाहरण असलेल्या मधुबाला यांचा १४ फेब्रुवारी १९३३साली जन्म झाला होता. योगायोग म्हणजे १४ फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणजेच प्रेमाचा दिवसही मानला जातो. त्यामुळेच कदाचित मधुबाला एवढ्या रोमॅन्टिक असाव्यात. त्यांच्या ८६व्या वाढदिवसानिमीत्त गुगलकडुनही डुडलद्वारे अभिवादन करण्यात आले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी....

मधुबाला यांच्या आयुष्याची दोर जरी कमी होती, तरी त्यांच्या जिवनात घडलेल्या काही घटनांमुळे त्या आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांच्या घायाळ अदा आणि सहजसुंदर अभिनयामुळे त्यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षापासून त्यांनी 'बेबी मुमताज' म्हणून चित्रपटात भूमिका साकारण्यास सुरुवात केली होती. त्यांचं नाव 'मुमताज जहां' असं होतं. त्यानंतर १९२७साली १४व्या वर्षी 'निल-कमल' चित्रपटातून मधुबाला नावाची सौंदर्याची खाण उद्याला आली.

undefined

रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या मधुबालाचे खासगी आयुष्यही अनेक गोष्टीने रंगलेले आहे. लहान असताना दिल्ली आकाशवाणीमध्ये लहान मुलांसाठी असलेल्या एका कार्यक्रमात संगीतकार मदनमोहन यांच्या वडिलांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना बॉम्बे टॉकीजचा चित्रपट 'बसंत'मध्ये बालकलाकाराची भूमिका दिली. 'बसंत'पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुढे अजरामर होत गेला.

असं म्हटलं जातं, की एका ज्योतिषाने मधुबाला यांचं भविष्य आधिच वर्तविलं होतं. त्यांनी सागितलं होतं, की मधुबालाच्या आयुष्यात खूप प्रसिद्धी असेल, संपत्ती असेल मात्र, त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रचंड दु:ख भोगावे लागेल. ज्योतिषाचे हे भविष्य खोटे ठरावे म्हणून त्यांचे आई-वडील त्यांना घेऊन दिल्लीहुन मुंबईत आले होते.

मुंबईत 'बसंत' चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर काही चित्रपटात अभिनयासोबतच गाणी गाऊनही मधुबालांचा पुढचा प्रवास सुरू होता. देविका रानी या त्यांचा अभिनय पाहून प्रभावित झाल्या होत्या. त्यांनीच नंतर त्यांचं नाव मधुबाला ठेवलं होतं.

दिग्दर्शक केदार शर्माच्या चित्रपटात मधुबाला यांना पहिल्यांदा मुख्य अभिनत्रीची भूमिका मिळाली. या चित्रपटाचं नाव होतं 'निलकमल'. राजकपूर यांच्यासोबत पहिल्यांदा त्यांना भूमिका साकारायला मिळाली. या चित्रपटानंतर त्यांना 'रुपेरी पडद्यावरची सोंदर्यांची देवी', अशी ओळख मिळाली.
undefined

त्यानंतर त्यांना 'महल' चित्रपटातूनही अमाप लोकप्रियता मिळाल. या चित्रपटात त्यांनी अशोक कुमार यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटानेही त्याकाळी तुफान लोकप्रियता मिळवली. या चित्रपटानंतर मधुबालानेही मागे वळुन पाहिले नाही. एकापाठोपाठ एक चित्रपट लोकप्रियतेची उंची गाठत गेले. राज कपूर, अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद अशा बड्या अभिनेत्यांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळत गेली.

पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट ठरला तो म्हणजे १९६० मध्ये आलेला 'मुगल-ए- आजम'. या चित्रपटाने त्यांना यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवले. यात त्यांनी साकालेली 'अनारकली'ची भूमिका आजही अजरामर आहे. या चित्रपटानंतर त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याचीही चर्चा सुरू झाली होती. त्यांची प्रेमकथा एका रोमॅन्टिक स्क्रिप्टनुसार सुरू झाली आणि त्याचा पुढे अंतही झाला. दिलीप कुमार त्यांच्या आयुष्यात आले तेव्हा त्या केवळ १७ वर्षांच्या होत्या.

undefined

असं म्हटलं जातं, की मधुबाला या खूप हळव्या मनाच्या होत्या. कोणावरही त्यांचं मन लगेच जडत असे. दिलीप कुमार नंतर त्यांच्या आयुष्यात किशोर कुमार यांची एन्ट्री झाली. 'चलती का नाम गाडी' मधील 'एक लडकी भीगी भागी सी' या गाण्याने किशोर कुमार यांनी मधुबालाच्या ह्रदयात आपली जागा निर्माण केली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर मधुबाला यांना ह्रदयाचा आजार झाला. त्यामुळे त्या नेहमी अस्वस्थ राहत असत. त्यांना लंडनमध्ये उपचार करण्यासाठी रवानाही करण्यात आले होते. मात्र, त्यांचा आजार एवढा बळावला होता, की डॉक्टरांनी सर्जरी करण्यास नकार दिला होता. त्यांच्या ह्रदयाच्या आजारामुळे त्या २३ फेब्रुवारी १९६९मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्याचा 'जलवा' हा चित्रपट रिलीज झाला होता. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

Intro:Body:

Actress Madhubala birthday special story

B'day Spl: आरसपाणी सौंदर्याचं मूर्तीमंत उदाहरण 'मधुबाला'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.