मुंबई - कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण देशात आहे. याच्या वाढत्या प्रार्दुर्भावामुळे समाज हतबल झालाय. देशात दहशतीचे वातावरण आहे. अशावेळी 'स्टाईल', 'एक्सक्यूज मी' आणि 'डबल क्रॉस' यासारख्या चित्रपटातून भूमिका केलेला अभिनेता साहिल खानवर मान खाली घालण्याचा प्रसंग आला आहे.
साहिलने एक व्हिडिओ शेअर करीत म्हटले होते की गोरेगाव येथील इंपीरियल हाईट्समध्ये दोन व्यक्तींना कोरोना झाला आहे. एकाचे वय ७२ असून दुसरा १८ वर्षाचा तरुण आहे. पण याचे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र साहिलकडे नाही.
या व्हिडिओमुळे सोसायटीमध्ये दहशत पसरली. त्यानंतर मिटींग घेण्यात आली. अफवा पसरवल्याबद्दल सर्वांनी साहिलला फैलावर घेतले. त्यानंतर त्याने सर्वांची माफी मागत व्हिडिओ डिलिट केला.
![Actor Sahil Khan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6529043_vvvv.jpg)
पहिला व्हिडिओ डिलिट करत त्याने नवा व्हिडिओ शेअर केलाय. यात तो कोणालाही कोरोना झाला नसल्याचे सांगताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">