मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ५ फेब्रुवारीला ४४ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला बऱ्याच कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्यानेही त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. सध्या अभिषेक आपल्या आगामी 'बॉब विश्वास' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या सेटवरही त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्याला सेटवर खास सरप्राईझ मिळाले.
सोशल मीडियावर मुकेश छाबरा यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन अभिषेकचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये अभिषेकच्या बऱ्याच फोटोंचा संग्रह असलेले पोस्टर पाहायला मिळते. त्याच्या लहानपणाच्या फोटोंचाही या पोस्टरमध्ये समावेश आहे.
-
Nomoshkar from the sets of #BobBiswas! 🙏🏻 To a special birthday celebration for a very special person! 👓🎂 Happy Birthday @juniorbachchan #bestwishes #TeamMCCC @CastingChhabra 🤗✨ pic.twitter.com/Gh6Xet8X8f
— MCCC (@MukeshChhabraCC) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Nomoshkar from the sets of #BobBiswas! 🙏🏻 To a special birthday celebration for a very special person! 👓🎂 Happy Birthday @juniorbachchan #bestwishes #TeamMCCC @CastingChhabra 🤗✨ pic.twitter.com/Gh6Xet8X8f
— MCCC (@MukeshChhabraCC) February 5, 2020Nomoshkar from the sets of #BobBiswas! 🙏🏻 To a special birthday celebration for a very special person! 👓🎂 Happy Birthday @juniorbachchan #bestwishes #TeamMCCC @CastingChhabra 🤗✨ pic.twitter.com/Gh6Xet8X8f
— MCCC (@MukeshChhabraCC) February 5, 2020
ऐश्वर्या रायनेही सोशल मीडियावर फॅमिली सेलेब्रिशनचा फोटो शेअर केला होता. तसेच आराध्या आणि अभिषेकसोबतचा एक सेल्फी देखील पोस्ट करुन तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'बॉब विश्वास'च्या सेटवरील अभिषेक बच्चनची झलक, पाहा व्हिडिओ
अमिताभ बच्चन यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या ब्लॉगवर अभिषेकचा लहानपणीचा एक फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
'बॉब विश्वास'च्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज अंतर्गत केली जात आहे. 'बॉब विश्वास'चे दिग्दर्शन नवोदित दीया घोष करणार आहे. तर, चित्रपटाची कथा सुजॉय घोष यांनी लिहिली आहे.
हेही वाचा - अभिषेकच्या वाढदिवसानिमित्य ऐश्वर्याने शेअर केला फॅमिली फोटो