ETV Bharat / sitara

अभिषेक बच्चनने सुरू केले घूमरचे शूटिंग : 'ही तर वाढदिवसाची सर्वोत्तम भेट' - आर बाल्कीसोबत अभिषेक बच्चन

वाढदिवस असल्याने अभिषेक बच्चन दुहेरी उत्सवाच्या मूडमध्ये दिसत आहे आणि त्याच्या या खास दिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपट 'घूमर'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती आर बाल्की करत आहेत.

अभिषेक बच्चनने सुरू केले घूमरचे शूटिंग
अभिषेक बच्चनने सुरू केले घूमरचे शूटिंग
author img

By

Published : Feb 5, 2022, 1:26 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तो आनंद द्विगुणीत करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. कारण त्याने आर बाल्कीसोबतचा त्याचा आगामी चित्रपट घूमरच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. घूमर शूट सुरू झाल्याची घोषणा त्याने सोशल मीडियावरुन केली आहे.

शनिवारी अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर घूमरच्या मुहूर्ताचा एक फोटो शेअर केला. अभिनेत्याने घूमरसह क्लॅपबोर्डचे चित्र टाकले आणि त्यावर दिग्दर्शकाचे नाव लिहिले. टीमने गणपतीची पूजा करून शूटिंग सुरू केल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिलंय की, याहून अधिक चांगली वाढदिवसाची भेट असू शकत नाही!"

आगामी चित्रपटातील तपशील गुलदस्त्यात ठेवला जात आहे आणि या चित्रपटाबद्दल फारसे काही माहिती नाही. हा चित्रपट बाल्की यांच्या होप प्रॉडक्शनच्या अंतर्गत तयार केला जात आह. हे प्रॉडक्शन हाऊस त्यांच्यासह त्यांची पत्नी गौरी शिंदे आणि अनिल नायडू यांच्या सह-मालकीचे आहे. आगामी चित्रपट 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'पा' नंतर बच्चनचा आर बाल्कीसोबतचा दुसरा चित्रपट आहे. 'पा'मध्ये अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका होत्या.

अभिषेकच्या चित्रपटांच्या लाइनअपमध्ये तुषार जलोटा दिग्दर्शित 'दसवी'चाही समावेश आहे. हा चित्रपट दिनेश विजन द्वारे बँकरोल केला जात आहे आणि यामी गौतम आणि निम्रत कौर देखील मुख्य भूमिकेत आहेत. मिस्ट्री थ्रिलर 'ब्रीद: इनटू द शॅडोज'च्या नवीन सीझनसाठी देखील अभिनेता परत झळकणार आहे. मयंक शर्मा दिग्दर्शित या शोमध्ये अभिषेक आणि अमित साध एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा - अभिषेक बच्चन: ज्यू. बच्चनच्या बालपणीच्या या मनोरंजक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.