ETV Bharat / sitara

'बच्चन पांडे'मध्ये अक्षयच्या विरोधात खलनायक साकारणार अभिमन्यू सिंह!! - Abhimanyu Singh to play villain in 'Bachchan Pandey'

भारतीय चित्रपट समीक्षक व व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार अभिमन्यू सिंह 'बच्चन पांडे' चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या विरोधात खलनायक साकारणार आहे.

Bachchan Pandey
'बच्चन पांडे
author img

By

Published : Jan 30, 2021, 5:05 PM IST

मुंबई - अभिनेता अभिमन्यू सिंह आगामी बच्चन पांडे या चित्रपटात सुपरस्टार अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. भारतीय चित्रपट समीक्षक व व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मतानुसार अभिमन्यू या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

"अभिमन्यू सिंह अक्षय कुमारच्या विरुध्द भूमिका साकारणार आहे. अभिमन्यू अक्षय कुमारची भूमिका असलेल्या बच्चन पांडे चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.'', असे तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Bachchan Pandey
तरण आदर्श यांचे ट्विट

कृती सेनॉनची मुख्य भूमिका असलेल्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करीत असून साजिद नाडियाडवाला याची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट २६ जानेवारी, २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. अक्षय, अभिमन्यु आणि कृती व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि अरशद वारसी यांच्याही भूमिका आहेत.

चित्रपटाचे शूटिंग गाडिसर तलाव आणि जैसलकोट यासारख्या ठिकाणी केले जाईल. या चित्रपटातील अक्षयची व्यक्तिरेखा अभिनेता होण्याची इच्छा असलेल्या गँगस्टरची आहे. तर कृती यामध्ये पत्रकाराच्या भूमिकेत असून ती दिग्दर्शक होण्याची स्वप्नं पाहणारी व्यक्तीरेखा आहे.

हेही वाचा - ‘आरएसव्हीपी‘ च्या आगामी ‘डीसपॅच’ मध्ये शीर्षक भूमिकेत पद्मश्री मनोज बाजपेयी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.