ETV Bharat / sitara

'लव्हयात्री'नंतर आयुष झळकणार 'क्वाथा'मध्ये, लष्करी अधिकाऱ्याची साकारणार भूमिका - kwatha

आयुष आता क्वाथा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका लष्करी अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असून आयुष यात त्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

'लव्हयात्री'नंतर आयुष झळकणार 'क्वाथा'मध्ये
author img

By

Published : Jun 5, 2019, 6:27 PM IST

मुंबई - बॉलिवूड भाईजान सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा काही महिन्यांपूर्वीच लव्हयात्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या या पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाच्या अपयशानंतर आयुष आता आणखी एका चित्रपटातून आपलं नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयुष आता क्वाथा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट एका लष्करी अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असून आयुष यात त्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. करण ललित भूटानी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर सुनिल जैन आणि आदित्य जोशी यांची निर्मिती असणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असणार असल्याचं म्हटलं जात असून हा एक अॅक्शन ड्रामा सिनेमा असणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.